मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट नाही, हा आहे सर्वाधिक मानधन मिळणारा कर्णधार, बाबर टॉप-10 मध्येही नाही

विराट नाही, हा आहे सर्वाधिक मानधन मिळणारा कर्णधार, बाबर टॉप-10 मध्येही नाही

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला करारबद्ध खेळाडू म्हणून बीसीसीआय (BCCI) वर्षाला 7 कोटी रुपये देते.

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला करारबद्ध खेळाडू म्हणून बीसीसीआय (BCCI) वर्षाला 7 कोटी रुपये देते.

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला करारबद्ध खेळाडू म्हणून बीसीसीआय (BCCI) वर्षाला 7 कोटी रुपये देते.

मुंबई, 23 मे : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला करारबद्ध खेळाडू म्हणून बीसीसीआय (BCCI) वर्षाला 7 कोटी रुपये देते. भारतीय खेळाडू म्हणून ही सर्वाधिक रक्कम आहे, पण जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेली बीसीसीआय कर्णधाराला सर्वाधिक पगार देत नाही. सर्वाधिक पगार मिळणाऱ्या जगातल्या कर्णधारांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. खेळाडूंच्या पगाराबाबत चर्चा व्हायचं कारण म्हणजे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या क्रिकेटपटूंच्या पगारात कपात करायचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे खेळाडू संतापले आहेत.

वेगवेगळ्या खेळाडूंचा करार बघितला तर कर्णधार म्हणून सर्वाधिक पगार मिळवणाऱ्यांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार जो रूट (Joe Root) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड रूटला वर्षाला 8.97 कोटी रुपये देतं. ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीमचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) आणि टेस्ट कर्णधार टीम पेन (Tim Paine) यांना प्रत्येकी 4.8-4.8 कोटी रुपये मिळतात.

दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याला 3.2 कोटी रुपये तर लिमिटेड ओव्हरचा कर्णधार टेंबा बऊमाला 2.5 कोटी रुपये मिळतात. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) वर्षाला 1.77 कोटी कमावतो. याशिवाय त्याला बोनस म्हणून 30 लाख रुपये मिळतात. इंग्लंडच्या वनडे टीमचा कर्णधार इयन मॉर्गनला (Eoin Morgan) 1.75 कोटी रुपये, वेस्ट इंडिजचा लिमिटेड ओव्हरचा कर्णधार कायरन पोलार्डला (Kieron Pollard) 1.73 कोटी आणि टेस्ट टीमचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला (Kraig Braithwaite) जवळपास 1.39 कोटी रुपये मिळतात.

बाबार आझम 11व्या क्रमांकावर

पाकिस्तानी टीमचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) वर्षाला 62.4 लाख रुपये पगार मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बाबरचा पगार इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. घरच्या मैदानांमध्ये मॅच होत नसल्यामुळे पाकिस्तान खेळाडूंना फार पैसे देऊ शकत नाही. श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) वर्षाला 51 लाख तर वनडे टीमचा कर्णधार कुसल परेरा 25 लाख रुपये कमावतो.

First published:

Tags: Cricket, Team india, Virat kohli