विराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण

विराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण

बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने पहिले फलंदाजी करत 205 धावांचा डोंगर रचला.

  • Share this:

26 एप्रिल : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात ओव्हरची गती कमी केल्यामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय.

बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने पहिले फलंदाजी करत 205 धावांचा डोंगर रचला. पण चेन्नईने अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनी तुफान खेळी केली. धोनीने 34 चेंडूत 70 धावा कुटल्यात. दोघांच्या या धडाकेबाज खेळीच्या बळावर चेन्नईने 205 चं टार्गेट पार केलं.

पण, सामन्यात आरसीबीकडून कमी गतीने षटकार टाकल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे विराट कोहलीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. आयपीएलच्या 11 व्या हंगामातलं हे पहिलं प्रकरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 06:00 PM IST

ताज्या बातम्या