IPL 2019 : 10 वर्षांनी विराटनं घेतली आपल्या 'या' लकी खेळाडूची मुलाखत, VIDEO व्हायरल

आरसीबीच्या ताफ्यात 10 वर्षांनी पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनचं आगमन झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 06:01 PM IST

IPL 2019 : 10 वर्षांनी विराटनं घेतली आपल्या 'या' लकी खेळाडूची मुलाखत, VIDEO व्हायरल

बंगळुरू, 22 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग सहा सामने हरणारी विराटची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जोशात कमबॅक केला. आणि सलग दोन सामने जिंकले. यात चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात केवळ 1 धावानं जिंकलेला सामना खास ठरला.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नईनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान RCBनं पफलंदाजी करत, केवळ पार्थिव पटेलच्या जीवावर 161 धावांपर्यंत मजल मारली. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 160 धावाच करता आल्या. यात धोनीची 84 धावांची खेळी व्यर्थ ठरली. चेन्नईला शेवटच्या षटकात 26 धावांची गरज असताना, धोनी केवळ 24 धावा करु शकला. या विजयात महत्त्वाचं योगदान होतं ते, डेल स्टेन या जलद गोलंदाजाचं. डेल स्टेननं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांना बाद करत, बंगळुरूला विजयाच्या जवळ नेले.

या मुलाखतीत कोहलीनं, “10 वर्षांनंतर या खेळाडूसोबत पुन्हा खेळताना खुप छान वाटतं. 2010नंतर स्टेन वेगळ्या संघात गेला. त्यानंतर वाटलं नव्हत की पुन्हा स्टेनसोबत खेळण्याची संधी मिळेल’’, असं सांगितलं. तर स्टेननं, “हा अनुभव शानदार आहे. विराट कोहली खुप मेहनती आहे, मला आनंद होतो की, तो 18 वर्षांचा असताना मी त्याच्यासोबत खेळलो होतो, आज हाच खेळाडू संघाचा कर्णधार आहे.आरसीबीच्या ताफ्यात 9 वर्षांनी पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनचं आगमन झालं आहे.स्टेन बऱ्याच काळानंतर पुन्हा पदार्पण करत आहे. त्यामुळं विराटच्या त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. डेल स्टेन साऊथ आफ्रिकेसाठी कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे. तर, स्टेन टी-20 सामन्यातल्या आपला शतकी आकडा पार करण्यासाठी सज्ज आहे.

विराट कोहलीचं 10 इयर चॅलेंज

सलग दुसऱ्या विजयानंतर कर्णधार विराट कोहली भलताच खुश पाहायला मिळाला. सामन्यानंतर विराटनं डेल स्टेनची मुलाखत घेतली आणि आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.डेल स्टेन 10 वर्षांपुर्वी बंगळुरु संघाकडून खेळला होता. त्याचनिमित्तानं सोशल मीडियावर विराट आणि डेल स्टेन यांचे जुने फोटो व्हायरल झाले. हा फोटो सामन्यानंतर खुद्द विराट कोहलीनं दाखवला.VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close