अंगठ्याला दुखापत झाल्यानंतरही खेळला विराट, सामन्यानंतर म्हणाला...

अंगठ्याला दुखापत झाल्यानंतरही खेळला विराट, सामन्यानंतर म्हणाला...

भारताचा कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतरही त्यानं खेळून संघाला विजय मिळवून दिला.

  • Share this:

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : भारताचा कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडिजच्या सामन्यावेळी हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचं विराटने सामन्यानंतर सांगितलं. भारताने तिसरा सामना जिंकून मालिका 2-0ने खिशात घातली. भारताकडून विराट कोहलीनं नाबाद शतक झळकावलं. त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार मिळाला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 255 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान भारतानं 32.3 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. दरम्यान, विंडीजचा वेगवान गोलंदाज केमार रोच याच्या चेंडूवर विराट कोहलीच्या अगंठ्याला दुखापत झाली. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र विराटने अंगठ्याला फ्रॅक्चर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानं सांगितलं की, अगंठ्याचं नख उचललं आहे. त्यामध्ये फ्रॅक्चर आहे असं मला वाटत नाही.

वर्ल्ड कपवेळी भारताचा सलामीवीर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतरही धवननं फलंदाजी करून भारताला विजय मिळवून दिला होती. सुरुवातीला दुखापत गंभीर नसल्याचं म्हटलं जात होतं मात्र नंतर त्याला संपूर्ण वर्ल्ड कपला मुकावं लागलं होतं. महेंद्रसिंग धोनीलासुद्धा हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळं सामना 35 षटकांचा खेळवण्यात आला. विंडीजनं 7 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 35 षटकांत 255 धावांचे आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 32.3 षटकांतच 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अखेरचा सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलनं वादळी खेळी केली. त्यानं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. त्यानंतर एविन लुईसनं 29 चेंडूत 43 धावां फटकावल्या. दोघांनी 115 धावांची भागिदारी केली. यातील 100 धावा तर 33 चेंडूतच केल्या होत्या. मात्र, एविन लुईस बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव गडगडला. शेवटी निकोलस पूरननं 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. या जोरावर विंडीजनं 240 धावांपर्यंत मजल मारली.

डकवर्थ लुईसनुसार भारताला 255 धावांचं आव्हान मिळालं. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि धवनने दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या फाबियान एलेननं 13 व्या षटकात धवन आणि पंतला लागोपाठ बाद केलं. धवन 36 धावांवर बाद झाला. दुसऱ्या सामन्याप्रमाणे यावेळी पुन्हा श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी शतकी भागिदारी केली. श्रेयस अय्यरनं 33 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अय्यर 65 धावांवर बाद झाला. त्याने कोहलीसोबत 120 धावांची भागिदारी केली.

विराटनं त्याच्या कारकिर्दीतील 43 वं एकदिवसीय शतक केलं. तसेच एका दशकात 20 धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. अय्यर बाद झाल्यानंतर विराटनं केदार जाधवसोबत 44 धावांची अभेद भागिदारी करत भारताला सामन्यासह मालिका जिंकून दिली.

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 01:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading