भारतासाठी Super Sunday, कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने जिंकला तिसरा टी२० सामना

भारतासाठी Super Sunday, कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने जिंकला तिसरा टी२० सामना

विराटने सामन्यात नाबाद ६२ धावांची खेळी खेळली. त्याला साथ दिली ती दिनेश कार्तिकने

  • Share this:

सिडनी, २५ नोव्हेंबर २०१८- सिडनी येथे खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताच्या या विजयामुळे टी२० मालिका अनिर्णित राहिली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर पावसामुळे दुसरा सामना रद्द करण्यात आला होता. मालिका अनिर्णित राखण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणं अपिरहार्य होतं. त्याचप्रमाणे ६ गडी राखून भारताने ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

विराटने सामन्यात नाबाद ६२ धावांची खेळी खेळली. त्याला साथ दिली ती दिनेश कार्तिकने. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरूवात केली. त्यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र शिखर धवन ४१ (२२) पाठोपात रोहित शर्मा २३ (१६) बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी धावांचा फलक हलता ठेवायचा प्रयत्न केला.

मात्र विराटला केएल राहुलचा फार साथ मिळाली नाही. १४ (२०) धावा करत राहुल तंबूत परतला. त्याच्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने तर सपशेल निराशा केली. एकही धावा न करता तो शुन्यावर बाद झाला. यानंतर भारत हा सामना जिंकतो की नाही असे वाटत असताना दिनेश कार्तिक आणि विराटने काही सुंदर चौकार आणि षटकार लगावले. अखेर कर्णधार विराट कोहलीने सलग २ चौकार लगावत सामना भारताच्या नावावर केला.

फिरकीपटू कृणाल पांड्याने कांगारु संघाचे महत्त्वाचे ४ गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला बाद केले. तर कृणालनेही ४ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना १६४ धावांमध्ये रोखले.

अॅरॉन फिंच आणि डी शॉर्ट या सलामवीरांनी सुरुवातीला केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली. फिंचने २८ धावांची खेळी केली तर शॉर्टने ३३ धावा केल्या.  पण त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग बाद झाल्याने ऑस्ट्रिलियाचा संघ संकटात सापडला होता. पण पुन्हा अॅलेक्स करे आणि स्टोनिस यांनी अनुक्रमे २७ आणि २५ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ भारतासमोर १६५ धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवू शकला.

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

First published: November 25, 2018, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading