अडचणीत आलेल्या कोहलीसाठी पुढचे 4 महिने महत्त्वाचे, 'या' चुकीमुळे टीम इंडियाला बसणार धक्का?

मैदानावरचा राडा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पडणार महागात.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 08:44 PM IST

अडचणीत आलेल्या कोहलीसाठी पुढचे 4 महिने महत्त्वाचे, 'या' चुकीमुळे टीम इंडियाला बसणार धक्का?

बंगळुरू, 23 सप्टेंबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिके विरोधात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं विराट कोहलीवर कधीही निलंबनाची कारवाई होऊ शकते. त्यामुळं पुढचे चार महिने विराटसाठी महत्त्वाचे आहेत. दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. मात्र, या सामन्यात विराट कोहलीकडून एक मोठी चुक झाली, त्याचा फटका त्याला बसला. आयसीसीनं विराट कोहलीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ पाचव्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना मैदानावर राडा झाला. भारतानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय विराटला काही फळास आला नाही. सलामीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान विराट कोहली फलंदाजीसाठी आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्युरन हॅंड्रिक्सच्या गोलंदाजीवर धावा काढताना विराटनं हॅंड्रिक्सला मारला. त्यामुळं विराटच्या खात्यात डिमॅरिट अंक जोडले गेले आहेत.

वाचा-कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

दरम्यान पुढचे चार महिने विराटसाठी महत्त्वाचे आहेत. या चार महिन्यात विराटला सांभाळून खेळावले लागणार आहे. विराट कोहलीनं आयसीसीच्या लेव्हल-1 नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळं आयसीसीच्या वतीनं विराटवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं आता विराटच्या गुणतालिकेत एक डिमॅरिट पॉइंटची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर विराटला चेतावणीही दिली आहे. विराटनं आयसीसीच्या आचारसंहिता कलम 2.12 मधली नियमांचे उल्लंघन केले आहे. यात एखादा खेळाडू सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडू, पंच, रेफ्री किंवा कोणत्याही व्यक्तीशी अनुसुचित प्रकारे शारीरिक संपर्क करू शकत नाही.

हाच नियम विराटनं तोडल्यामुळं त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं विराटच्या नावावर आणखी एका डेमेरिट गुणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर 2016नंतर विराट कोहलीनं असे तिसऱ्यांदा केले आहे. त्यामुळं विराटच्या नावावर आता तीन डिमॅरिट गुणाची नोंद झाली आहे.याआधी कोहलीनं दक्षिण आफ्रिका विरोधात 15 जानेवारी 2018मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यानंतर 2019मध्ये अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात डिमॅरिट गुणाची नोंद झाली.

Loading...

वाचा-पंतने विराटला तोंड लपवायला जागा ठेवली नाही, शेवटी टोपीचा आधार!

चार महिने विराटला सांभाळून घेळण्याची गरज

कोहलीच्या खात्यात आता आणखी एक डिमॅरिट गुण आल्यास त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा टी-20 सामन्यांची बंदी लागू शकते. त्यामुळं कोहलीनं 15 जानेवारी 2020 पर्यंत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नाहीतर विराटवर मोठी कारवाई होऊ शकते. आयसीसीच्या नियमांनुसार 24 महिन्यांच्या आत चार किंवा त्याहून जासत डिमॅरिट पॉइंट्स असतील तर खेळाडूला निलंबन करण्यात येते. त्यामुळं कोहलीसाठी पुढचे चार महिने महत्त्वाचे आहे.

वाचा-टीम इंडियात चाललंय काय? चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...