मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटने इंग्लंडमध्ये फडकवला तिरंगा, टीम इंडियाच्या उपस्थितीत ध्वजारोहण

विराटने इंग्लंडमध्ये फडकवला तिरंगा, टीम इंडियाच्या उपस्थितीत ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनी टीम इंडियाने केलं ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनी टीम इंडियाने केलं ध्वजारोहण

भारत देश 75 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करत असताना भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड (India vs England) दौऱ्यावर आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने लंडनमध्ये ध्वजारोहण (Team India flag hosting) केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
लंडन, 15 ऑगस्ट : भारत देश 75 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करत असताना भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड (India vs England) दौऱ्यावर आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने लंडनमध्ये ध्वजारोहण (Team India flag hosting) केलं. यावेळी त्याच्यासोबत कोच रवी शास्त्री आणि टीमचे इतर सगळ सदस्य उपस्थित होते. भारतीय टीम सध्या इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची दुसरी मॅच खेळत आहे. टीम इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला. या व्हिडिओमध्ये विराट कोहली तिरंगा फडकवताना दिसत आहे. 1 मिनीट 40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये खेळाडू राष्ट्रगीतही गात आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली मॅच पावसामुळे ड्रॉ झाली, तर दुसऱ्या टेस्टमध्ये 4 दिवसांचा खेळ झाला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर हा सामना सुरू आहे.
First published:

Tags: Independence day, India vs england, Team india, Virat kohli

पुढील बातम्या