पांड्या बंधूंच्या वडिलांच्या निधनानं विराटलाही दु:ख, म्हणाला, 'भेटलो होतो तेव्हा...'

पांड्या बंधूंच्या वडिलांच्या निधनानं विराटलाही दु:ख, म्हणाला, 'भेटलो होतो तेव्हा...'

टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचे वडील हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचं शनिवारी निधन झालं.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचे वडील हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचं शनिवारी निधन झालं. हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे हिमांशू पांड्या यांनी जीव गमावला. दोन्ही क्रिकेटपटूंच्या वडिलांच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने या कठीण प्रसंगी पांड्या कुटुंबाबात दु:ख व्यक्त केलं आहे.

'हार्दिक आणि कृणालच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी वाचून दु:ख झालं आहे. माझं आणि त्यांचं 2-3 वेळा बोलणं झालं आहे. त्यांचं व्यक्तीमत्व खूप आनंदी आणि आयुष्य जगणारं होतं,' असं विराट म्हणाला. हार्दिक पांड्या हा काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे, तर विराटची पत्नी अनुष्का शर्मानेही 11 जानेवारीला मुलीला जन्म दिला.

वडिलांच्या मृत्यूमुळे कृणाल पांड्या बायो-बबलमधून बाहेर आला आहे. कृणाल पांड्या हा सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळत आहे. तो बडोद्याच्या टीमचा कर्णधार आहे. तर हार्दिक पांड्या ही स्पर्धा खेळत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज खेळून हार्दिक पांड्या घरी परतला आहे.

Published by: Shreyas
First published: January 16, 2021, 12:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या