IPL 2019 : 'या' नकोत्या विक्रमामुळं कोहली होतोय भलताच ट्रोल

232 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्य फलंदाजांनी हैदराबादसमोर नांगी टाकली.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 07:15 PM IST

IPL 2019 : 'या' नकोत्या विक्रमामुळं कोहली होतोय भलताच ट्रोल

हैदराबाद, 31 मार्च : : आयपीएलच्या बाराव्या हंगामात आतापर्यंत अनेक विक्रम नोंदवण्यात आलेत. त्यात काही चांगले तर काही लाजीरवाणे विक्रमही आहेत. पण बंगळुरू हा असा संघ आहे, ज्यांच्या नावावर सर्वात जास्त धावा करण्याचा आणि सर्वात कमी धावा असे दोनही विक्रम आहेत.2013 साली पुणे संघा विरोधात बंगळुरूनं 263 धावा केल्या होत्या. तर, 2017 साली कोलकता विरोधात बंगळुरूचा संपुर्ण संघ 49 धावांवर बाद झाला होता. आजच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मात्र, आपला सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम मोडण्याची दुर्दशा बंगळुरु संघावर येणार होती.मात्र त्यांनी हा लाजीरवाणा आकडा पार केला. 232 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्य फलंदाजांनी हैदराबादसमोर नांगी टाकली तर, प्रथम टॉस जिंकत विराटनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो पाणी टाकले.या दोघांनी मिळून केवळ 187 धावा केल्या. यामुळं आपल्या लगातार तिसऱ्या पराभवाच्या वाटेवर असलेल्या बंगळुरू संघाला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.अखेर बंगळुरूनं 100चा आकडा पार केला, त्यामुळं त्यांनी आपला लाजीरवाणा आकडा तरी पार केला आहे.


मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...