मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोनाल्डोसाठी विराट झाला भावुक; म्हणाला, 'कोणती ट्रॉफी किंवा विजेतेपद....'

रोनाल्डोसाठी विराट झाला भावुक; म्हणाला, 'कोणती ट्रॉफी किंवा विजेतेपद....'

फिफा वर्ल्ड कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न भंगलं. यानंतर रोनाल्डोसाठी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

फिफा वर्ल्ड कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न भंगलं. यानंतर रोनाल्डोसाठी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

फिफा वर्ल्ड कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न भंगलं. यानंतर रोनाल्डोसाठी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 12 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोच्या समर्थनार्थ भावूक पोस्ट केली आहे. क्वार्टर फायनलमध्ये पोर्तुगालचा पराभव झाल्यानं त्यांना फिफातून बाहेर पडावं लागलं. फिफा वर्ल्ड कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न भंगलं. यानंतर रोनाल्डोसाठी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. विराटने म्हटलं की, तुम्ही ट्रॉफी किंवा स्पर्धा जिंकली नाही तरी यामुळे फरक पडत नाही.

    विराटने पहिल्यांदा रोनाल्डोबाबत अशी पोस्ट केलीय असं नाही. विराटने नेहमीच आपल्यावर पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोचा प्रभाव असल्याचं सांगितलंय. रोनाल्डोमुळे आपण डाएट बदलला आणि फिटनेसबाबत जागरूक बनल्याचं विराटने याआधी म्हटलं आहे. फक्त फिटनेसच नाही तर क्रिकेटमध्येही त्याने अमुलाग्र असा बदल केला. आपल्या या नव्या क्रिकेटच्या माध्यमातून कोहलीने सिद्ध करून दाखवलं की तो रोनाल्डोचा सर्वात मोठा चाहता आहे.

    हेही वाचा : पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, भारतासह ९ देशांनाही जमली नाही अशी कामगिरी

    फुटबॉल जगतात आणि जगभराताली चाहत्यांसाठी तु जे काही केलं आहेस ते कोणताही ट्रॉफी किंवा स्पर्धा कमी करू शकत नाही. कोणतेही विजेतेपद हे सांगू शकत नाही की लोकांवर तुझा किती प्रभाव आहे किंवा जेव्हा आम्ही तुला खेळताना पाहतो तेव्हा मी आणि इतर लोकांना काय वाटतं. जो नेहमी आपल्या मनातलं बोलतो, कठोर मेहनत आणि समर्पणाचं प्रतिक आहे. कोणत्याही खेळाडुसाठी एक खरीखुरी प्रेरणा आहेस आणि तू एक खरा आदर्श आहेस. माझ्यासाठी GOAT आहेस असं विराट म्हणाला आहे.

    हेही वाचा : बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा बाहेर

    रोनाल्डोने वर्ल्ड कपमधील पराभवानंतर म्हटलं की, पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप जिंकणं हे माझं सर्वात मोठं स्वप्न होतं. सुदैवाने मी पोर्तुगालसोबत अनेक स्पर्धा जिंकल्या पण सर्वात मोठा वर्ल्ड कप जिंकण्याचं माझं स्वप्न होतं. यासाठी मी लढलो. माझ्या या स्वप्नासाठी मोठा संघर्ष केला. मला फक्त इतकंच वाटतं की प्रत्येकाने समजून घ्यावं की खूप काही लिहिलं गेलंय, सांगितलं गेलंय, अंदाज लावण्यात आलेत पण पोर्तुगालसाठी माझं समर्पण हे एक क्षणही कमी झालेलं नाही.

    First published:

    Tags: FIFA, FIFA World Cup, Football, Instagram, Virat kohli