मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...म्हणून T20 World Cup 2021च्या संघात yuzvendra chahalला स्थान नाही; विराटने केला खुलासा

...म्हणून T20 World Cup 2021च्या संघात yuzvendra chahalला स्थान नाही; विराटने केला खुलासा

T20 World Cup 2021...म्हणून संघात yuzvendra chahalला स्थान नाही; विराट कोहलीने केला खुलासा

T20 World Cup 2021...म्हणून संघात yuzvendra chahalला स्थान नाही; विराट कोहलीने केला खुलासा

टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021)सुरुवात होण्यासाठी काही तास उरले आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या संघातुन युझवेंद्र चहलला (yuzvendra chahal)वगळण्यात आले आहे. दरम्यान, विराटने(Virat Kohli) याबाबत खुलासा केला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
दुबई, 17 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चहलच्या चाहत्यांना टी20 वर्ल्ड कपच्या संघात युजवेंद्र चहलला का (Virat Kohli Explains Reason Behind Selecting Rahul Chahar Over Yuzvendra Chahal)स्थान दिलेले नाही. याचा खुलासा केला आहे. तसेच, आर अश्विनच्या संघनिवडीवरही विराटने भाष्य केले आहे. विराट कोहलीने चहलला वगळण्याचे आणि राहुल चाहरला संघात समाविष्ट करण्याचे कारण दिले. विराट कोहली म्हणाला, 'युझवेंद्र चहलला वगळणे हा एक कठीण निर्णय होता. पण, राहुल चाहरने गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. हे वाचा- विराट कोहलीला त्याच्या मित्रांनी मागितली भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीटं! चाहरची वेगवान गोलंदाजी आणि श्रीलंका दौऱ्यादरम्यान, इंग्लंडविरुद्ध त्याने केलेली गोलंदाजी अप्रतिम होती. असे विराटने आयसीसीने आयोजित केलेला कॅप्टन कॉलमध्ये सांगितले.

युएईमधील अप्रितम प्रदर्शनामुळे राहुल चाहरची संघात निवड

यूएईमधील खेळपट्टीवरचा त्याच खेळ पाहसा राहुल चाहरची निवड करण्यात आली आहे. जो वेगवान चेंडू फिरवतो तो फलंदाजांना अधिक अडचणीत आणतो. चाहर वेगवान गोलंदाजीसह स्टंपवर अॅटकदेखील करतो. त्याला तिथे चांगल्य विकेट्स मिळतात. त्याची हीच खेळी संघवनिवडीवेळी सर्वांना भावली. असे मत विराटने यावेळी व्यक्त केले.

पण क्रिकेट जगतात चर्चा आयपीएलमधील प्रदर्शनाची

आयपीएल 2021चा 14 वा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात आला. यंदाच्या या सीझनमध्ये राहुल चाहरचे खराब प्रदर्शन पाहायला मिळाले तर, युझवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी केली. राहुल चाहरने मुंबई इंडियन्सकडून फक्त 4 सामने खेळले आणि त्याला फक्त 2 बळी टिपता आले. तर युझवेंद्र चहलने यूएईच्या यूएईच्या खेळपट्टीवर 9 सामन्यात 14 बळी घेतले. हे वाचा- पाकिस्तानपूर्वी 'या' दोन देशांशी होणार टीम इंडियाची लढत, पाहा संपूर्ण वेळापत्रक युझवेंद्र चहलने यूएईच्या खेळपट्टीवर राहुल चाहरपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. असे असूनही या लेग स्पिनरला टी -20 विश्वचषक संघात स्थान मिळाले नसल्याने चहलचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच अश्विनच्या संघनिवडीवरही विराटने भाष्य केले. अश्‍विनने अलीकडच्या काळात त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आहे. प्रत्येकाने पाहिले आहे की गेल्या दोन वर्षांत अश्विनने मोठ्या फटकेबाजांविरुद्ध कठीण षटके टाकली आहेत. तो एक असा खेळाडू आहे ज्याने अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. तसेच, अश्विनला व्हाईट बॉलवर चांगले प्रदर्शन केल्यामुळे बक्षीसही देण्यात आले आहे. असे मत विराटने यावेळी व्यक्त केले आहे.
First published:

Tags: T20 world cup, Virat kohli, Yuzvendra Chahal

पुढील बातम्या