मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोहली-रोनाल्डो एका इन्स्टाग्राम पोस्ट करून किती कमावतात? किंमत ऐकून व्हाल शॉक

कोहली-रोनाल्डो एका इन्स्टाग्राम पोस्ट करून किती कमावतात? किंमत ऐकून व्हाल शॉक

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, असं असलं तरी त्याचा सोशल मीडियावरचा जलवा अजूनही कायम आहे. विराट कोहली सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

    मुंबई, 22 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, असं असलं तरी त्याचा सोशल मीडियावरचा जलवा अजूनही कायम आहे. विराट कोहली सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. अनेक युवा खेळाडूंसाठी विराट प्रेरणा आहे. खेळासाठी त्याचा असलेला जुनून विराटला इतर खेळाडूंपेक्षा वेगळं करतो. अनेकांना विराटचा मैदानातला आक्रमक स्वभावही आवडतो. विराट कोहली इन्स्टाग्रामवर ज्या पोस्ट करतो त्यातूनही त्याची कमाई होते. मागच्या तीन वर्षांमध्ये विराटला क्रिकेटच्या कोणत्याच फॉरमॅटमध्ये शतक करता आलेलं नाही. किंग कोहली नावाने लोकप्रिय झालेल्या विराटचा फॅनबेसही मोठा आहे. सोशल मीडियावर विराट सर्वाधिक फॉलोअर्स असणारा क्रिकेटपटू आहे. आऊट ऑफ फॉर्म असलेला विराट इन्स्टाग्राम फॉलोअर्स आणि कमाईच्या बाबतीत टॉप क्रिकेटपटू आहे. वेबसाईट hopperhq.com च्या एका रिपोर्टनुसार कोहली इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 14व्या क्रमांकावर आहे. टॉप-25 सेलिब्रिटींमध्ये विराट एकमेव आशियाई आहे. इन्स्टाग्रामवर विराटचे 20 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या रिपोर्टनुसार कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 8.69 कोटी रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डो (Ronaldo) टॉपवर आहे. इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे 44 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एका पोस्टसाठी रोनाल्डो 19 कोटी रुपये घेतो, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. दिग्गज फुटबॉलर लियोनल मेस्सी (Messi) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सी एका पोस्टसाठी 14 कोटी रुपये कमावतो. तर अमेरिकन मॉडेल काईली जेनर इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून 14.6 कोटी रुपये कमाई करते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Virat kohli

    पुढील बातम्या