VIDEO : विराटची केली नक्कल आणि झाला टिकटॉक स्टार, बघा जमलयं का?

विराट कोहलीचा हा डुप्लिकेट सध्या टिकटॉक स्टार झाला आहे. त्याच्या व्हिडिओमुळं चाहतेही संभ्रमात आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 01:19 PM IST

VIDEO : विराटची केली नक्कल आणि झाला टिकटॉक स्टार, बघा जमलयं का?

नवी दिल्ली, 23 जुलै : भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होत आहे. दरम्यान आता कर्णधार विराट कोहलीला या दौऱ्यावर विजय मिळवत कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे. यातच विराट की रोहित शर्मा कोणाकडे भारतीय संघाचे कर्णधारपद असणार हे सुध्दा या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात विराट सारखाच हुबेहुब दिसणारा गौरव अरोरा चर्चेचा विषय बनल आहे.

गौरव अरोरा सध्या टीकटॉकवर विराट कोहलीचा डुप्लिकेट म्हणून चर्चेत आला आहे. त्यामुळं गौरव टिकटॉक स्टार झाला आहे. गौरवचे 40 लाख फॉलोअर्स असून विराटच्या नावाची जर्सी परिधान करून गौरव टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करत असतो. काही व्हिडिओमध्ये तर तो विराटची नक्कल करतानाही दिसत

आहे.

विराटचे चाहतेही हा गौरवचे व्हिडिओ पाहून तो अचंबित झाले आहेत. त्यामुळं सलमान खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर यांच्यानंतर विराट कोहलीचा हा डुप्लिकेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...

वाचा-World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

वाचा- धोनीला निवृत्ती घेण्यापासून संघ व्यवस्थापनाने थांबवलं ?

ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर केला. भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वाचा- धोनीने लष्कराच्या वर्दीत केला सॅल्यूट, VIDEO VIRAL

काय आहे रेल्वेची 'मिशन पाच मिनिट' योजना? यासोबत 5 मिनिटांत 25 बातम्यांचा झटपट आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...