Home /News /sport /

विराटला वाटतेय ही भीती, म्हणून सोडली नाही वनडेची कॅप्टन्सी!

विराटला वाटतेय ही भीती, म्हणून सोडली नाही वनडेची कॅप्टन्सी!

विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टी-20 टीमचं कर्णधारपद सोडण्याचा (Virat Kohli Quits Captaincy) निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 18 सप्टेंबर : विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टी-20 टीमचं कर्णधारपद सोडण्याचा (Virat Kohli Quits Captaincy) निर्णय घेतला आहे. बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून विराटने याबाबतची माहिती दिली. खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण टी-20 चं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं विराट त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. विराटने फक्त टी-20 क्रिकेटचंच नेतृत्व का सोडलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एवढंच नाही तर टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला अपयश आलं तर विराटला वनडे टीमचं कर्णधारपदही गमवावं लागू शकतं, असं बोललं जातंय. विराट कोहली याला त्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूबाबत (Virat Kohli Brand Value) भीती वाटत असल्यामुळे त्याने वनडेचं कर्णधारपद सोडलं नसल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. द टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार टी-20 सोबत वनडेचं कर्णधारपद सोडलं तर ब्रॅण्ड व्हॅल्यू प्रभावित होईल, असं विराटला वाटत आहे, पण अनेक तज्ज्ञांनी अशी शक्यता फार कमी असल्याचं बोलून दाखवलं आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची ब्रॅण्ड व्हॅल्यूदेखील प्रभावित झाली नाही. निवृत्तीनंतरही सचिन मोठ्या कंपनीचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे. टीम इंडियात फूट, सिनियर खेळाडू विराटवर नाराज, थेट जय शाहंकडेच तक्रार क्रिएटिज कम्युनिकेशन्सचे संस्थापक नवरोज डी ढोंडी म्हणाले, 'सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar) ही गोष्ट कधी झाली नाही. सचिनचं समर्थन कधी कमी झालं नाही. जेव्हा त्याने कॅप्टन्सी सोडली तेव्हाही नाही. हीच गोष्ट विराटसाठीही लागू होते. जरी त्याने वनडे टीमचं नेतृत्व सोडलं तरी याचा त्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूवर फार फरक पडणार नाही.' बीसीसीआयने मात्र विराट कोहलीच्या मुद्द्यावर मौन बाळगलं आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांनी त्याच्या टी-20 मधल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले आणि कौतुकही केलं. पण दोघंही विराटच्या वनडे आणि टेस्ट कॅप्टन्सीवर काहीही बोलले नाहीत. विराट कोहली आणि निवड समितीमध्ये जोरदार खडाजंगी, या खेळाडूवरून झाला वाद! विराटनंतर टी-20 टीमचा कर्णधार कोण होणार? याबाबतही बीसीसीआयकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहे. याशिवाय केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावावरही विचार केला जाऊ शकतो. विराट कोहली आता आयपीएलमध्ये (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) कर्णधारपद भूषावताना दिसेल. आयपीएलच्या या मोसमात आरसीबीने 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. विराटची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीला अजूनपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. Shocking! रोहित शर्माला टीम इंडियाच्या Vice Captain पदावरुन हटवण्याचा होता विराटचा प्लान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या