मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: अर्धशतक होताच कोहलीनं थेट मैदानातच लेकीसाठी झुलवला पाळणा, Video Viral

IND vs SA: अर्धशतक होताच कोहलीनं थेट मैदानातच लेकीसाठी झुलवला पाळणा, Video Viral

Virat Kohli

Virat Kohli

विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडेत अर्धशतक झळकावलं. यानंतर आपल्या खास शैलीत विराटनं हाफसेन्च्युरीचा आनंदही साजरा केला

केपटाऊन, 24 जानेवारी : केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पहिल्याच वन डे मालिकेत भारतीय संघाला 3-0 असा पराभव पत्करावा (South Africa vs India 3rd ODI )लागला. विराट कोहलीनं (Virat Kohli)कर्णधारपद सोडल्यांनतर भारतीय संघाला पराभवाचे धक्के बसले. पण, त्याने या मॅचदरम्यान आपल्या करीअरमधील 64वे अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धशतकाची साक्षीदार यंदा त्याची मुलगी वामिका ठरली. मॅचमध्ये त्याची पत्नी अनुष्का शर्मासह मुलगी वामिका(vamika) हिनेदेखील हजेरी लावली होती. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने आपल्या खास शैलीत अर्धशतकाचे सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अर्धशतक झळकावल्यानंतर विराटने थेट आपल्या बॅटचा पाळणा केला. बॅट झुलवतेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी विराटने शतकी खेळी केल्यानंतर पत्नी अनुष्काला फ्लाईंग किस दिले होते. आता त्याने थेट मुलगी वामिकासाठी बॅटचा पाळणा केला अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान, तिसरा आणि अखेरचा मॅच पार पडली. 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांपैकी नुकताच कॅप्टन्सीवरुन पायउतार झालेला विराट कोहली या मॅचमध्ये चांगलाच फॉर्मात दिसला. विराट कोहलीनं 84 चेंडूमध्ये 65 धावा केल्या. दरम्यान, आपलं अर्धशतक झाल्यानंतर आनंदीत झालेल्या विराटनं पॅव्हेलियनकडे बॅट दाखवली.

विराटचं आपली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतली अर्धशतकी खेळी आपल्या मुलीच्या नाववर केली. अनुष्कासोबत टाळ्या वाजताना विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका कॅमेऱ्यात कैद झाली. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Virat kohli, Virat kohli and anushka sharma