Home /News /sport /

IPL 2020 : विराट कोहलीचा हा भन्नाट डान्स बघितलात का? पाहा VIDEO

IPL 2020 : विराट कोहलीचा हा भन्नाट डान्स बघितलात का? पाहा VIDEO

सेलिब्रशनच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या खेळांडूचा हटके अंदाज हा क्रिकेटमध्‍ये सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र, यात भारतीय खेळाडूही यात मागे नाहीत. रॉयल्स चॅलेंजर बँगलोर (RCB) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) च्या सामन्याआधी विराट कोहली (Virat Kohli) च्या डान्सचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

पुढे वाचा ...
    शारजाह, 17 ऑक्टोबर : सेलिब्रशनच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या खेळांडूचा हटके अंदाज हा क्रिकेटमध्‍ये सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र, यात भारतीय खेळाडूही यात मागे नाहीत. रॉयल्स चॅलेंजर बँगलोर (RCB) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) च्या सामन्याआधी विराट कोहली (Virat Kohli) च्या डान्सचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. विराट कोहली हा त्याच्या क्रिकेटसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. गुरूवारी झालेल्या सामन्यापूर्वी कोहलीने मैदानावर डान्स केला. हा विराटचा बँगलोर संघाकडून खेळलेला 200 वा सामना होता. या डान्सचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचआधी सरावादरम्यान विराटने केलेला हा हटके डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पंजाबविरुद्धचा हा सामना आरसीबीने गमावला मात्र, सामन्यापूर्वीचे हे हास्याचे क्षण व्हायरल झाले आहेत. या क्षणाचा आनंद विराटसोबत व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सुद्धा घेतला. सामन्यापूर्वी खेळाडू सराव करतात, त्याच पद्धतीने कोहली हा सराव करत असताना या कसरतीलाच त्याने डान्सचे रूप दिले. या मॅचमध्ये मैदानात उतरताच विराटने विक्रमाला गवसणी घातली. आरसीबीसाठी विराटचा हा 200वा सामना होता. टी-20 क्रिकेटमध्ये एका टीमकडून 200 मॅच खेळणारा विराट हा जगातला एकमेव खेळाडू आहे. आरसीबीने मला टीममध्ये कायम ठेवलं, हा माझ्यासाठी सन्मान आहे. एका टीमकडून 200 मॅच खेळणं अविश्वसनिय आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करताना बँगलोरने 171 रन केल्या होत्या. यानंतर मात्र, पंजाबच्या गेलने धडाक्यात पुनरागमन केले. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 रनची गरज असतानाही पंजाबने ही मॅच रोमांचक केली. शेवटच्या बॉलला एक रनची गरज असताना निकोलस पूरनने सिक्स मारून पंजाबला जिंकवलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या