विराटला विश्रांती दिल्यास रोहित कर्णधार, धोनीचे काय?

विराटला विश्रांती दिल्यास रोहित कर्णधार, धोनीचे काय?

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 24 तारखेला होणार आहे. दरम्यान, विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात टी20 मालिका होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून विराट कोहलीनं सर्वाधिक सामन्यांमध्ये खेळला आहे. भारतीय संघाने एकूण 56 सामने खेळले त्यापैकी 48 सामन्यात विराट होता.

कामाचा दबाव लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन विराटला विश्रांती देण्याची शक्यता आहे. शेवटी विराट कोहलीचं काय मत आहे हेसुद्धा पाहिलं जाईल. त्याला त्याची क्षमता माहिती आहे. त्यामुळे गरज पडली तर विराट स्वत: विश्रांतीची गरज आहे हे सांगू शकतो अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.

भारत आणि बांगला देश यांच्यातील टी20 मालिकेला 3 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 7 नोव्हेंबरला राजकोटमध्ये, तिसरा सामना 10 नोव्हेंबरला नागपुरमध्ये होणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबरपासून इंदौरमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. यानंतर डिसेंबरमध्ये विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप पासून संघाबाहेऱ आहे. तो बांगलादेश दौऱ्यापासून संघात पुनरागमन करेल असं म्हटलं जात आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी एकाही सामन्यात दिसलेला नाही. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीचीही चर्चा रंगली होती. आता 24 तारखेला संघ जाहीर केले जाणार आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गांगुलीनेही धोनीबाबतच्या निर्णयावर निवड समितीशी बोलल्यानंतर आपलं मत व्यक्त करणार असं सांगितलं होतं. तसेच धोनीनेदेखील अद्याप बांगलादेश दौऱ्यावर जाणार किंवा नाही याबद्दल काहीच स्पष्ट केलेलं नसल्यानं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

वाचा : कर्णधाराच्या हकालपट्टीनंतर शेअर केला VIDEO, क्रिकेट बोर्डाला मागावी लागली माफी

दुसरीकडे निवड समिती युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहेत. त्यांची कामगिरी चांगली असून त्यांनी संधी मिळू शकते.

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या