विराटनं मितालीचं अभिनंदन करताना केली ही चूक

विराटनं मितालीचं अभिनंदन करताना केली ही चूक

अभिनंदन करताना त्याने फोटो मात्र वेगळ्याच महिला क्रिकेटपटूचा शेअर केला. यामुळे सोशल मीडियावर विराट टीकेचा धनी ठरलाय.

  • Share this:

13 जुलै: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने वनडेतल्या 6000 धावा पूर्ण केल्याबद्दल विराट कोहलीने तिचं फेसबुकवर अभिनंदन तर केलं पण अभिनंदन करताना त्याने फोटो मात्र वेगळ्याच महिला क्रिकेटपटूचा शेअर केला. यामुळे सोशल मीडियावर विराट टीकेचा धनी ठरलाय.

काही दिवसांपूर्वी मितालीनं तिच्या वनडे करिअरमध्ये 6000धावा पूर्ण केल्या. इतक्या धावा करणारी ती पहिलीच महिली क्रिकेटपटू ठरलीय. म्हणूनच संपूर्ण क्रीडाविश्वातून तिच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशावेळी भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही फोटो शेअर करून मितालीचं अभिनंदन केलं. पण त्याने जो फोटो शेअर केला तो पूनम राऊत या महिला क्रिकेटपटूचा होता.

त्याच्या या  फोटोवर अनेक कमेंन्ट आल्या. काही जणांनीही चूक हसण्यावारी नेऊन ती सुधारण्याचा सल्ला विराटला दिला .तर अनेकांनी कर्णधार असून एवढंही कसं माहीत नाही असा प्रश्नही विचारला. आपली चूक कळल्यावर विराटने ही पोस्ट लगेच डिलिट केली.

दरम्यान ज्या सामन्यात मितालीने 6000 धावा पूर्ण केल्या त्या सामन्यात भारतीय संघानं मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 03:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading