Home /News /sport /

'वेळ अशीच निघून जाते,' विराटच्या मनात नेमकं काय? इंग्लंडला पोहोचताच शेअर केला इमोशनल Video

'वेळ अशीच निघून जाते,' विराटच्या मनात नेमकं काय? इंग्लंडला पोहोचताच शेअर केला इमोशनल Video

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आज टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 जून 2011 ला त्याने आपल्या टेस्ट करियरची सुरूवात वेस्ट इंडिजविरुद्ध किंगस्टनमध्ये केली होती.

    मुंबई, 20 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आज टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 जून 2011 ला त्याने आपल्या टेस्ट करियरची सुरूवात वेस्ट इंडिजविरुद्ध किंगस्टनमध्ये केली होती. मागच्या 11 वर्षांमध्ये विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या काळात विराटच्या करियरमध्ये अनेक चढ-उतारही आले. टेस्ट क्रिकेटमध्ये 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या टेस्ट क्रिकेटचा प्रवास दाखवला आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून 17 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीची आठवणीतली शतकं, टेस्ट सीरिज विजय आणि टीममधले सहकारी आणि समर्थक दिसत आहेत. 2011 साली टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 101 टेस्ट खेळल्या, यात त्याने 49.95 च्या सरासरीने 8,043 रन केले. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 27 शतकं आणि 28 अर्धशतकं आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 254 नाबाद आहे. सगळ्यात यशस्वी टेस्ट कॅप्टन मागच्या 11 वर्षांमध्ये विराटने त्याच्या बॅटिंगसोबतच कॅप्टन्सीमध्येही कमाल केली. 2014 च्या शेवटी विराट टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार झाला. एमएस धोनीने अचानक निवृत्ती घेतल्यानंतर नेतृत्वाची धुरा विराटच्या खांद्यावर आली. विराटने 68 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, यातल्या 40 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर 17 मॅचमध्ये टीमला पराभूत व्हावं लागलं. विराट टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. मागच्या तीन वर्षांपासून त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक करता आलेलं नाही. विराटचं अखेरचं शतक नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध झालं होतं. कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये विराटने ही खेळी केली होती. इंग्लंडविरुद्ध 1-5 जुलैदरम्यान होणाऱ्या टेस्टमध्ये आता विराट खेळताना दिसेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, Virat kohli

    पुढील बातम्या