मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोहितबाबत बोलताना विराट पुन्हा वैतागला, कॅप्टन कोहलीची उद्वीग्न प्रतिक्रिया

रोहितबाबत बोलताना विराट पुन्हा वैतागला, कॅप्टन कोहलीची उद्वीग्न प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी (India vs South Africa) भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषद घेतली. माझ्यात आणि भारताच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचं विराट कोहली म्हणाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी (India vs South Africa) भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेत विराटने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कॅप्टन्सीच्या वादावरही भाष्य केलं. माझ्यात आणि भारताच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचं विराट कोहली म्हणाला. नवीन कर्णधार आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मी पूर्णपणे सहकार्य करेन, असा विश्वासही विराटने व्यक्त केला.

'माझ्या आणि रोहित शर्मामध्ये काहीही वाद नाही, मागच्या दोन वर्षांपासून मी हे सांगून थकलो आहे, वैतागलो आहे.' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. सोबतच माझी कोणतीही हरकत किंवा निर्णय टीमला खाली दाखवणारा नसेल. टीमला योग्य दिशेने घेऊन जाणं, हीच माझी जबाबदारी असेल. रोहित एक सक्षम कर्णधार आहे, तसंच राहुल द्रविड उत्कृष्ट मॅनेजर आहे. वनडे आणि टी-20 मध्ये माझं शंभर टक्के समर्थन त्यांना आहे, असं विराट म्हणाला.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधीच रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले, त्यामुळे तो टेस्ट सीरिज खेळणार नाही. यानंतर लगेचच विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजमधून विश्रांती घेणार असल्याचं वृत्त समोर आलं, विराटने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. वनडे सीरिजसाठी मी उपलब्ध होतो आणि आहे. ज्यांनी खोटं लिहिलं त्यांना या गोष्टी विचारल्या पाहिजेत, असं वक्तव्य विराटने केलं.

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं.

First published:

Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli