मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Virat vs BCCI : विराटला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर भडकला कोच, बीसीसीआयकडे ताकद पण...

Virat vs BCCI : विराटला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर भडकला कोच, बीसीसीआयकडे ताकद पण...

विराट कोहली (Virat Kohli)आणि बीसीसीआयमध्ये (BCCI) वादाची ठिणगी पडल्याचं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद आणखी वाढला.

  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli)आणि बीसीसीआयमध्ये (BCCI) वादाची ठिणगी पडल्याचं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद आणखी वाढला. कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. ही गोष्ट आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी निवड समितीने सांगितली, असं विराट म्हणाला. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं पण तो ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली होती. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याचं सांगत गांगुलीचा दावा खोडून काढला.

भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या या वादावर विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'विराटसोबत जे झालं ते पाहून मी हैराण झालो. यावर मी काय बोलू? पण जे काही झालं ते होणं गरजेचं नव्हतं. या प्रकरणावर मी फार बोलणार नाही, पण बोर्डाकडे अधिकार आणि ताकद आहे, त्यांनी जो निर्णय घेतला तो विचार करून घेतला असेल. जे झालं ते योग्य का अयोग्य, यावर माझं मत महत्त्वाचं नाही,' असं राजकुमार शर्मा म्हणाले.

'मी विराटची पत्रकार परिषद बघितली नाही, पण त्याच्यासोबत जे झालं ते खूप कमीवेळा ऐकायला आणि बघायला मिळतं. बीसीसीआय आणि विराट यांच्यात संभाषणाचा अभाव दिसत आहे. याप्रकरणी पारदर्शकता हवी होती. हे का आणि कसं झालं? संवादाचा अभाव कशामुळे झाला, हे मला माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया विराटच्या प्रशिक्षकांनी दिली.

First published: