News18 Lokmat

IPL 2019 : तब्बल 1095 दिवसांनी विराटनं पुन्हा केला हा पराक्रम, पाहा VIDEO

2016 साली विराटनं तर, सलग चार शतक ठोकले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 10:36 PM IST

IPL 2019 : तब्बल 1095 दिवसांनी विराटनं पुन्हा केला हा पराक्रम, पाहा VIDEO

कोलकाता, 19 एप्रिल : आतापर्यंत आठ सामन्यांपैकी सात सामने गमावलेला आणि गुणतालिकेत अगदी तळाच्या क्रमांकावर असलेला संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. या संघाचं नाव जरी रॉयल असलं तरी, आयपीएलच्या या हंगामात त्यांची रॉयल अशी खेळी पाहायला मिळाली नाही. पण आज कोलकाता विरुद्धच्या सामन्यात अगदी अंतिम सामना खेळत असल्याच्या जोशात विराट कोहलीचा संघ खेळत आहेत.Loading...

कोलकातानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण कोहलीनं गोलंदाजांची पिसं काढली. 57 चेंडूत विराटनं आपलं आयपीएलमधला पाचवं शतक ठोकलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे कोहलीनं शेवटचं आयपीएल शतक 2016 साली ठोकलं होतं. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी विराटनं शतक आज ठोकलं.कोहली सध्या सगळ्यात जास्त शतक मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर धडाकेबाज ख्रिस गेल आहे. गेलनं आतापर्यंत 6 शतक ठोकले आहे. तर, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी 4 शतक मारले आहे.2016 साली विराटनं तर, सलग चार शतक ठोकले होते. त्याच्या या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर तीन वर्षांपूर्वी बंगळुरू संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता. तसेच आजच्या सामन्यात कोहलीनं 37वे अर्धशतक पुर्ण करत, सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांना मागे टाकले आहे. तसेच, आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा आकडा पार करणार विराट हा दुसरा फलंदाज आहे. 2016 हे साल विराटसाठी खास ठरलं. त्या एका वर्षात विराटनं 4 शतकांच्या जोरावर 973 धावा केल्या होत्या.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूकडून सलामीला आलेल्या पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांना चांगली सुरुवात करण्यात आली नाही. दरम्यान पार्थिव पटले 11 धावांवर बाद झाला. सुनील नारायणच्या फिरकीनं पार्थिन पटेलला चकमा दिला आणि RCBला 18 धावांवर पहिला फटका बसला. आरसीबीच्या विरोधात सुनील नारायणचीही 16वी विकेट होती. त्यानंतर विराटची बॅट तळपली. विराटनं मोईन अली सोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्याच्या जोरावर बंगळुरूनं कोलकाताला धावांचे आव्हान दिलं.


VIDEO : 'जयकांत शिक्रे'नी सांगलीत घेतली 'या' उमेदवारासाठी विराट रॅली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 10:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...