Home /News /sport /

'गांगुली विराटला काय म्हणाला माहिती नाही, पण...', भारताच्या माजी कोचची वादात उडी

'गांगुली विराटला काय म्हणाला माहिती नाही, पण...', भारताच्या माजी कोचची वादात उडी

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. विराट आणि बीसीसीआयने (BCCI) सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं असलं, तरी दोन्हीकडून आलेल्या वक्तव्यांमुळे वाद असल्याचं स्पष्ट होत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. विराट आणि बीसीसीआयने (BCCI) सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं असलं, तरी दोन्हीकडून आलेल्या वक्तव्यांमुळे वाद असल्याचं स्पष्ट होत आहे. या वादावर 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य आणि भारताचे माजी प्रशिक्षक मदन लाल (Madan Lal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) या वादावर स्पष्टपणे बोललं पाहिजे, अस मदन लाल यांना वाटतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराटन कॅप्टन्सीच्या वादावर सविस्तर भूमिका मांडली. टेस्ट टीमच्या निवडीच्या दीड तास आधी मला तू वनडे टीमचा कर्णधार असणार नाहीस, असं निवड समितीने सांगितल्याचं विराट म्हणाला. तसंच आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं कोणीही सांगितलं नव्हतं, असं विराट म्हणाला. विराटने हे वक्तव्य करत गांगुलीचा दावा खोडून काढला. आम्ही विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं, पण विराट ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार असावा, असं वाटत होतं. त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं दादा म्हणाला. दादाचा हाच दावा विराटने फेटाळून लावला, त्यानंतर वादाला तोंड फुटलं. भारतीय क्रिकेटमधल्या या वादावर मदन लाल एएनआयशी बोलताना म्हणाले, 'मला वाटतं या स्थितीला चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं. कारण हा वाद नाही, तर वैचारिक अंतर आहे. सौरव गांगुली विराटला काय म्हणाला, हे मला माहिती नाही, त्यामुळे मी यावर टिप्पणी करणार नाही. पण अध्यक्ष असल्यामुळे सौरव गांगुलीने पुढे येऊन हा वाद संपवला पाहिजे. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, कारण आपल्यासाठी ही महत्त्वाची सीरिज आहे.' 'सुनिल गावसकर या मुद्द्यावर जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. कोहलीने टीम मॅनेजमेंटसोबत हा मुद्दा सोडवायला पाहिजे होता. ही काही मोठी गोष्ट नव्हती. मला वाटतं सिलेक्टर्सही यावर तोडगा काढतील. असे वाद थांबवणं निवड समितीचं काम आहे. त्यांनी आपला निर्णय घ्यायच्या आधी विराटशी चर्चा केली का नाही, हे मला माहिती नाही,' असं वक्तव्य मदन लाल यांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Sourav ganguly, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या