टी20 मध्ये विराटच नंबर वन, रोहित शर्माला टाकलं मागे

टी20 मध्ये विराटच नंबर वन, रोहित शर्माला टाकलं मागे

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवला.

  • Share this:

मोहाली, 19 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात भारतानं 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 72 धावांची खेळी करून एकहाती विजय मिळवून दिला. यासह विराट हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा फक्त 7 धावांनी मागे आहे. त्यामुळे यापुढे दोघांमध्ये स्पर्धा असेल.

विराट कोहलीच्या 66 डावात 2 हजार 441 धावा झाल्या आहेत. तर रोहित शर्माने 89 डावात 2 हजार 434 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मानंतर या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे. त्याच्या 75 डावात 2 हजार 283 धावा झाल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक 104 डावात 2 हजार 263 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीनं फक्त 71 सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर रोहित शर्माला मात्र 26 सामने जास्त खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात त्यानं 2 षटकारांसह 12 धावा केल्या. पुढचा सामना 22 सप्टेंबरला बेंगळुरूत होणार आहे.

आफ्रिकेनं दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखऱ धवन यांनी चांगली सुरुवात केली. 4 ओव्हरमध्ये 33 धावांची भागिदारी या दोन्ही फलंदाजांनी केली, यात रोहित शर्मानं दोन उत्कृष्ठ षटकार लगावले. मात्र फेहलुकवायोनं आपल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. शर्मा 12 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटची अडखळत सुरुवात झाली. मात्र त्यानंतर धवन आणि कोहलीनं 51 धावांची भागिदारी केली.

India vs South Africa : कॅप्टन की सुपरहिरो? विराटचा कॅच पाहून आफ्रिकेला आठवला जॉन्टी ऱ्होड्स , पाहा VIDEO

India vs South Africa : कॅच का बदला कॅचसे! मिलर की विराट कोण भारी तुम्हीच ठरवा

विधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता?, इतर टॉप 18 बातम्या

Published by: Suraj Yadav
First published: September 19, 2019, 8:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading