IPL 2019 : विराट कोहलीचा दुष्काळ अखेर संपणार ?

IPL 2019 : विराट कोहलीचा दुष्काळ अखेर संपणार ?

आज बंगळुरू युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे.

  • Share this:

बंगळुरू, 07 एप्रिल : आयपीएलला सुरूवात होऊन दोन आठवडे झाले असताना, बंगळुरू संघाला अद्याप एकदाही विजयाची चव चाखता आलेली नाही. यामुळं बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आपला दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान आज बंगळुरू युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. सलग पाच सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे या सामन्यात कुणाचं पारडं जड असेल याकडे, तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

बंगळुरू संघाला आतापर्यंत 3 हाता तोंडाशी आलेला सामना गमवावा लागला आहे. मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत बेंगळूरुचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र अखेरच्या षटकांत आंद्रे रसेलने केलेल्या तुफानी फलंदाजीपुढे बेंगळूरुच्या गोलंदाजांची दैना झाली आणि पहिल्या विजयाचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. सध्या अंकतालिकेत बेंगळूरुचा तळाला आहे.

दरम्यान एका मुलाखती दरम्यान, विराट कोहलीनं पराभवाच खापर गोलंदाजांवर फोडले होतं. दरम्यान बंगळुरू संघाकडं आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पुरेसा अनुभव असलेला विदेशी गोलंदाज नसल्यामुळे त्यांची गोलंदाजी खरतर फारच कमकुवत वाटत आहे. तर, बंगळुरू संघा क्षेत्ररक्षणातही कमकुवत आहे, आतापर्यंत बेंगळूरुच्या खेळाडूंनी तब्बल १३ झेल सोडले आहेत. त्यामुळे बेंगळूरुला संघप्रयोग करण्याबरोबरच सांघिक कामगिरीवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading