मुंबई, 14 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुन्हा एकदा गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोमवारी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तेव्हापासून या दोघांच्या चाहत्यांनी या चर्चांना सुरूवात केली आहे.
आयपीएल 2022 संपल्यानंतर विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि त्यांची मुलगी वामिका मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. मालदीवमध्ये विराट कोहलीने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला होता, तर अनुष्काचा मोनोकिनी लूकचा फोटोही व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक झाली होती, त्यानंतर विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधून ब्रेक घेतला होता. आता विराट कोहली याच आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तर अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं लग्न 11 डिसेंबर 2017 ला झालं होतं. यानंतर 11 जानेवारी 2021 ला अनुष्का शर्माने गोंडस मुलीला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat kohli