मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद, 24 तासात जमा झाले तब्बल एवढे पैसे

विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद, 24 तासात जमा झाले तब्बल एवढे पैसे

कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये (Corona Virus) लोकांची मदत करण्यासाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुढे आले.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 मे : कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये (Corona Virus) लोकांची मदत करण्यासाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुढे आले. कोरोनाशी लढण्यासाठी विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या चाहत्यांना मदत करण्याचं आव्हान केलं. चाहत्यांकडून आलेली मदतीची रक्कम एसीटी ग्रांट्सला (ACT Grants) दिली जाणार आहे. एसीटी ग्रांट्स ऑक्सिजन आणि उपचारांशी जोडल्या गेलेल्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम करते. विराट आणि अनुष्काने सात दिवसांच्या या मोहिमेत 7 कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण मागच्या 24 तासांमध्येच त्यांना 3.6 कोटी रुपये जमा करण्यात यश आलं आहे.

विराट कोहलीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली. 24 तासांपेक्षा कमी वेळात 3.6 कोटी रुपये, खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संघर्ष करा आणि देशाची मदत करा, धन्यवाद, असं विराट त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.

शुक्रवारी विराट कोहलीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. 'आपला देश सध्या कठीण काळातून जात आहे. देशाला सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्याची गरज आहे. मी आणि अनुष्का मागच्या एका वर्षापासून लोकांचा त्रास बघत आहोत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला,' असं विराट म्हणाला.

'आम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करण्यासाठी काम करत आहोत. भारताला सध्या आपल्या सर्वाधिक मदतीची गरज आहे. गरजूंना मदत करण्यासाठी आम्ही हा विडा उचलला आहे. तुम्ही सगळे मदतीसाठी पुढे याल, याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही एकजूट आहोत आणि या लढाईमध्ये आम्ही नक्की जिंकू,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली. प्रत्येक छोट्या प्रयत्नाने फरक पडतो, आपण एकत्र याचा मुकाबला करू, असं अनुष्का शर्मा म्हणाली.

First published:

Tags: Anushka sharma, Coronavirus, Virat kohli