...अन् अनुष्काकडे पाहून विराटने घेतले अंगठीचे चुंबन

  • Share this:

कालचा दिवस हा फक्त विराट कोहलीचा होता. इंग्लंडच्या जमिनीवर कसोटी सामन्यात विराटने पहिलं शतक साजरं केलं. त्याने साखरपुड्याच्या अंगठीला किस करत त्याचा आनंद साजरा केला.

इंग्लंडच्या एजबेस्टनमध्ये सुरू असलेल्या भारत- इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावलं.

इंग्लंडने भारताला २८७ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या नाकी नऊ आले. २७४ धावांमध्ये पूर्ण भारतीय संघ गुंडाळला गेला. दुसऱ्या दिवसाअखेरीस इंग्लंडने एक गडी गमावत ९ धावा केल्या.

गेल्या चार वर्षांपासून विराट इंग्लंडच्या जमिनीवर फारसं चांगला खेळत नाही असा आरोप केला जात होता. मात्र त्याच्या या १४९ धावांच्या खेळीने विरोधकांची बोलती बंद केली.

विराटने शतक झाल्यानंतर त्याच्या अनोख्या शैलीने गळ्यातील अंगठी काढून पत्नी अनुष्का शर्माकडे इशारा करत किस केले.

Loading...

विराटने मोहम्मद शमी, इशान  शर्मा आणि उमेश यादव यांच्यासोबत १०५ धावांची भागीदारी केली.

विराट १५० धावा करेल असे त्याच्या चाहत्यांना वाटत असतानाच एका चुकीच्या फटक्यावर तो १४९ धावांवर झेल बाद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...