• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कोरोनाच्या लढाईमध्येही विराटचा रेकॉर्ड, 6 दिवसात जमा केले तब्बल एवढे पैसे

कोरोनाच्या लढाईमध्येही विराटचा रेकॉर्ड, 6 दिवसात जमा केले तब्बल एवढे पैसे

कोरोना संकटाच्या (Corona Virus) काळात रुग्णांची मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे येत आहेत. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील (Anushka Sharma) रुग्णांच्या मदतीसाठी मोहिम राबवत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 12 मे : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. भारतात दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत, तसंच प्रत्येक दिवशी 4 हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. या संकटाच्या काळात रुग्णांची मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे येत आहेत. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील (Anushka Sharma) रुग्णांच्या मदतीसाठी मोहिम राबवत आहेत. बुधवारपर्यंत या दोघांनी कोरोनाच्या लढाईसाठी 11 कोटी रुपये जमा केले आहेत. विराट आणि अनुष्काने 7 कोटी रुपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण या दोघांनी मिळून यापेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने या अभियानासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत. यातून जमा झालेली रक्कम एसीटी ग्रांट्सला (ACT Grants) दान करण्यात येणार आहे. एसीटी ग्रांट्स ऑक्सिजन आणि उपचारांशी जोडल्या गेलेल्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम करते. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या या अभियानाला एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशनने पाच कोटी रुपयांची मदत केली आहे. यानंतर विराटने ट्वीट करून फाऊंडेशनचे आभार मानले. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत तुम्ही दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या मदतीसाठी धन्यवाद. आम्ही कोरोनाशी लढण्यासाठीचं आमचं लक्ष्य आता 11 कोटी रुपये करत आहोत. तुमच्या या मदतीबद्दल मी आणि अनुष्का तुमचे आभारी आहोत,' असं ट्वीट विराटने केलं. विराट आणि अनुष्का ही मोहिम 7 दिवस चालवणार आहेत. 7 मेपासून त्यांच्या या अभियानाला सुरुवात झाली आहे.
  Published by:Shreyas
  First published: