मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटकडे खरंच आहे प्रायव्हेट जेट? खुद्द कॅप्टननेच दिलं उत्तर

विराटकडे खरंच आहे प्रायव्हेट जेट? खुद्द कॅप्टननेच दिलं उत्तर

भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पैसे कमावण्याच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च खेळाडूंमध्ये आहे. विराट कोहलीकडे असणाऱ्या महागड्या गाड्यांची नेहमीच चर्चा होते, तसंच त्याच्याकडे प्रायव्हेट जेट असल्याचंही बोललं जातं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 22 डिसेंबर : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पैसे कमावण्याच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च खेळाडूंमध्ये आहे. विराट कोहलीकडे असणाऱ्या महागड्या गाड्यांची नेहमीच चर्चा होते, तसंच त्याच्याकडे प्रायव्हेट जेट असल्याचंही बोललं जातं. विराटने स्वत:च या सगळ्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. एका लोकप्रिय वेबसीरिजमध्ये रोल करण्याबद्दलही लोकांनी विराटला प्रश्न विचारले. विराटने एका व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली आहेत. विराट कोहलीने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेयर केली. एका कंपनीच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये त्याने हीलियम गॅसच्या फुग्याच्या हवेने बोलण्याचा प्रयत्न केला. हा गॅस तोंडात धरून जर बोलण्याचा प्रयत्न केला, तर आवाजात खूप बदल होतो. एवढच नाही तर अनेकांचा आवाज लहान मुलगा किंवा मुलीसारखा येतो. विराट या व्हिडिओमध्ये असाच बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहलीने या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल गुगल सर्च झालेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यातला एक प्रश्न होता विराटकडे प्रायव्हेट जेट आहे का? याचं उत्तर त्याने नाही ही अफवा आहे, असं दिलं. तसंच त्याला लोकप्रिय वेबसीरिजमध्ये तू प्रोफेसरला रोल केला होतास का? असंही विचारण्यात आलं, तेव्हा त्याने त्याचा चेहरा माझ्यासारखा होता, पण मी ती भूमिका केली नाही, असं सांगितलं. शाळेमध्ये मी सरासरी विद्यार्थी होतो, कधीच मी टॉपर बनलो नाही, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज खेळणार आहे. 3 मॅचच्या या सीरिजमध्ये विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे, कारण दक्षिण आफ्रिकेत भारताने एकदाही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही.
First published:

पुढील बातम्या