विराटपेक्षा स्मिथ वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते

विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यात कोण बेस्ट? यावरून चाहत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झालं आहे.

  • Share this:

अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी जिंकली. या विजयात स्टीव्ह स्मिथनं महत्त्वाची भूमिका बजावली. स्मिथने दोन्ही डावात संघाला अडचणीतून बाहेर काढलं. पहिल्या डावात 142 तर दुसऱ्या डावात 144 धावांची खेळी केली.

स्मिथच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यानंतर स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम कोण याची चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी त्यांचं मत स्मिथच्या पारड्यात टाकलं आहे.

स्मिथनं कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला मागे टाकलं. स्मिथच्या पुढे पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आहे.

स्टीव्ह स्मिथनं 65 कसोटीमध्ये 6 हजार 485 धावा केल्या आहेत. यात त्यानं 52 शतकं केली असून त्याशिवाय 24 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कसोटी क्रमवारीत पुढे असला तरी कसोटींची संख्या आणि धावा यांच्यातील फरक पाहता स्मिथ वरचढ दिसत आहे.

विराटने 77 सामन्यात 6 हजार 613 धावा केल्या आहेत. तर स्मिथने 65 कसोटीतच हा आकडा गाठला आहे. विराटने 25 शतकं केली असून 20 अर्धशतकं केली आहेत. स्मिथने विराटपेक्षा 12 कसोटी कमी खेळल्या आहेत. त्यामुळं अर्थातच तो विराटला मागे टाकू शकतो.

फक्त कसोटी क्रिकेटमध्ये दोघांची तुलना करायची म्हटलं तर स्मिथ वरचढ ठरतो. मात्र, वनडे आणि टी20 मध्ये विराट स्मिथपेक्षा सरस आहे. विराटने दोन्ही प्रकारात स्मिथपेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2019 09:20 AM IST

ताज्या बातम्या