Wisden's Leading Cricketers: विराट कोहलीची हॅट्रीक तर, स्मृती मानधनाचे पर्दापण

Wisden's Leading Cricketers: विराट कोहलीची हॅट्रीक तर, स्मृती मानधनाचे पर्दापण

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना बुधवारी विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले.

  • Share this:

लंडन, 10 एप्रिल : भारतीय संघाचा कर्णधार, स्टार फलंदाज विराट कोहली आणि मराठमोळी महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना यांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विस्डन क्रिकेट या बहुचर्चित मासिकेकडून देण्यात येणारा  सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूचा गौरव यंदा विराट कोहली आणि स्मृती मानधना यांना मिळाला आहे.

विशेष म्हणजे विस्डन क्रिकेट अवार्ड मिळवण्यात कोहलीनं हॅट्रीक केली आहे. सगल तिसऱ्यांदा त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बीयूमोंट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे. तर, आफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशीद खान हा सलग दुसऱ्यांदा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.

विस्डन या मासिकेकडून 1889 सालापासून विस्डन क्रिकेट पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार वर्षभरात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 2735 गुणांची कमाई केली आहे. इंग्लंड विरुद्ध तर, कोहलीचा बॅट चांगलीच तळपली होती. इथं पाच कसोटी सामन्यांत त्यानं 593 धावा केल्या होत्या.

तर, दुसरीकडं महिला क्रिकेटपटूत भारताच्या स्मृती मानधनानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिनं 2018 मध्ये एकदिवसीय व ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीला हा जवळजवळ सर्व पुरस्कार जिंकणारा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी त्यानं सर गारफिल्ड सोबर ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आयसीसी सर्वोत्तम  पुरुष कसोटी खेळाडू आणि आयसीसी सर्वोत्तम  पुरुष एकदिवसीय खेळाडू हे पुरस्कारही आपल्या नावावर केले होते. आता या भारताच्या स्टार कर्णधाराच्या शिरपेचात विस्डन क्रिकेट पुरस्काराचा तुराही रोवण्यात आला आहे.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 10, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या