Home /News /sport /

विराट कोहली आणि निवड समितीमध्ये जोरदार खडाजंगी, या खेळाडूवरून झाला वाद!

विराट कोहली आणि निवड समितीमध्ये जोरदार खडाजंगी, या खेळाडूवरून झाला वाद!

टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर विराट कोहली टी-20 फॉरमॅटचं (Virat Kohli Steps Down) कर्णधारपद सोडणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी विराट आणि निवड समिती यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे.

    मुंबई, 18 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर विराट कोहली टी-20 फॉरमॅटचं (Virat Kohli Steps Down) कर्णधारपद सोडणार आहे. खुद्द विराटनेच बुधवारी याची घोषणा केली. टी-20 चं नेतृत्व सोडलं तरी विराट वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे. नेतृत्व बदलाबाबत मागच्या 6 महिन्यांपासून चर्चा सुरू असल्याचं बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितलं. त्यातच आता विराट आणि निवड समिती यांच्यामध्ये वाद झाल्याचं वृत्त आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या वनडे सीरिजसाठी निवड समितीला विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा ओपनरला संधी द्यायची होती, पण विराट कोहली शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नावावर अडून राहिला. हा वाद इतका वाढला होता की विराट आणि निवड समितीमध्ये एकमत होत नसल्यामुळे बीसीसीआयने टीमची निवड पाच दिवस उशीरा केली. अखेर शिखर धवन याची वनडे टीममध्ये निवड झाली. क्रिकबझने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये शिखर धवनला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्यात मात्र शिखर धवनला वनडे आणि टी-20 टीमचा कर्णधार करण्यात आलं. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे शिखर धवनला ही जबाबदारी देण्यात आली. टी-20 वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये मात्र धवनची निवड करण्यात आली नाही. IPL 2021 : टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराट आणखी एक धक्का देणार! विराटवर बीसीसीआय नाराज दुसरीकडे पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार विराट कोहलीचा रोहित शर्माला (Rohit Sharma) उपकर्णधारपदावरून हटवण्याचा प्लान होता. बीसीसीआय मात्र विराटच्या या भूमिकेमुळे नाराज झाली. रोहित शर्मा वनडे टीमच्या उपकर्णधार पदावरून हटविण्यात यावं, असा प्रस्ताव विराटने दिला होता. रोहित 34 वर्षांचा आहे, हे यामागे कारण दिलं गेलं होतं. वनडे टीमचं उपकर्णधारपद केएल राहुलला सोपविण्यात यावं, तर टी20 फॉर्मेटमध्ये ही जबाबदारी पंतांकडे असावी, अशी विराटची इच्छा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डालादेखील विराट कोहलीचं हे वागणं आवडलं नव्हतं. Shocking! रोहित शर्माला टीम इंडियाच्या Vice Captain पदावरुन हटवण्याचा होता विराटचा प्लान एवढच नाही तर ज्युनियर खेळाडूंच्याही विराटबाबत तक्रारी असल्याचं पीटीआयला सूत्रांनी सांगितलं. विराट अडचणीच्या वेळी खेळाडूंना मध्येच सोडून देतो. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियात 5 विकेट घेतल्या त्यानंतर त्याला बाहेर करण्यात आलं. ऋषभ पंतसोबतही असाच प्रकार घडला. उमेश यादवला फक्त एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तरच संधी मिळते, पण त्याच्यासोबत संवाद साधला जात नाही, असं एका क्रिकेटपटूने सांगितलं. विराट कोहलीच्या बाबतीत संवादाचा अभाव आहे. धोनीच्या हॉटेल रूम कायमच उघडी असायची. त्याच्या रूममध्ये जाऊन खेळाडू प्ले स्टेशनवर गेम खेळायचे तसंच त्याच्यासोबत खुलून बोलायचे. एवढच नाही तर रोहित शर्माही खेळाडूंना बाहेर जेवायला घेऊन जात त्यांना कम्फर्टेबल करतो, असंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या