गावसकर यांनी केला गौप्यस्फोट, विराट-रोहित यांचे भांडण कधीच संपणार नाही!

गावसकर यांनी केला गौप्यस्फोट, विराट-रोहित यांचे भांडण कधीच संपणार नाही!

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भांडणावर दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केले आहे.

  • Share this:

गयाना, 09 ऑगस्ट : वर्ल्ड कपनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरू झाले होते. दरम्यान विराटनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी या सगळ्या अफवा असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र त्यांच्याच अजूनही कुशलमंगल आहे, असे वाटत नाही आहे. विराट-रोहित भांडणावर आता दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी मोठा खुलासा केला आहे.

सुनील गावसकर यांनी या दोन खेळाडूंमधील भांडण कधीच सुटणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. गावसकर यांनी स्पोर्ट्स स्टारमध्ये लिहिलेल्या लेखात यासंबंधी भाष्य केले आहे. गावसकर यांनी, “रोहित आणि विराट यांनी आपल्यात सगळं ठिक आहे, असा कांगावा केला तरी परिस्थिती बदलणार नाही. जेव्हा जेव्हा रोहित आऊट होईल, तेव्हा तेव्हा तो मुद्दाम बाद झाला असेच म्हटले जाईल. कोणी अस म्हणणार नाही की, तो फेल झाला तर संघातून त्याला बाहेर काढण्यात येईल. त्यामुळं मुद्दाम आऊट होऊन तो स्वत:च्याच अडचणी वाढवत आहे, याचा विचार कोणी करणार नाही”, असे लिहिले आहे. तसेच, “या सगळ्या अफवांमुळे संघातील वातावरण खराब होते. खेळाडूंना त्याचा त्रास होते”, असेही ते म्हणाले.

वाचा-जडेजा-रोहितनं केली बुमराह आणि विराटची मस्करी, VIDEO VIRAL

द्वेषामुळं संघातील वातावरण बिघडतं आहे.

गावसकर यांनी, “ज्या काही विराट आणि रोहित यांच्या वादाच्या गोष्टी आहे, त्या पसरवणारी लोक शुभचिंतक नसतात. द्वेषामुळं अशा गोष्टी पसरवल्या जातात, ज्याचा परिणाम संघावर होते”, असे लिहित मीडियावरही टीका केली. “मीडिया काही झालं तरी, याबाबत बातम्या छापणार. या दोघांचे भांडण येत्या 20 वर्षातही काही संपणार नाही. दोघंही संघाला सामने जिंकून देतील पण वाद संपणार नाही”, असे गावसकर यांनी सांगितले.

वाचा-अभिनेत्रींना सोशल मीडियावर टक्कर देतेय ‘या’ क्रिकेटपटूची पत्नी

विराटनं केले होते अफवांचे खंडण

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं या सगळ्या अफवा असल्याचे मत व्यक्त केले होते. संघात असे काही नसून भारतीय संघाला अव्वल स्थानावर ठेवणे हे सगळ्यांचे ध्येय असल्याचे सांगितले होते.

वाचा-अखेर BCCI झुकलं! नाडाच्या रडारावर येणार क्रिकेटपटू

VIDEO : चंद्रकांत पाटील म्हणाले, 'त्या' कामाचं तरी महाजनांचं कौतुक करावं!

Published by: Akshay Shitole
First published: August 9, 2019, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading