News18 Lokmat

World Cup : '...तर आम्हाला चॅम्पियन होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही'

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:19 PM IST

World Cup : '...तर आम्हाला चॅम्पियन होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही'

मुंबई, 21 मे : विश्वचषकासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ आज इंग्लंडसाठी रवाना झाला. दरम्यान याआधी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटनं यंदाचा भारतीय संघ हा सर्वोत्तम संघ असून आम्हाला चॅम्पियन बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही, अशी कबुली दिली. तसेच, ‘’प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्त्वाचं आहे, दडपण नसले तरी आम्ही तयार आहोत’’, असे विराट म्हणाला.

यावेळी कर्णधार विराट कोहलीनं विश्वचषकासाठी आयपीएल महत्त्वाची असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी विराटनं, “आयपीएलमध्ये आमचे खेळाडू चांगले खेळले. त्यामुळं आयपीएलचा आम्हाला फायदाच होणार आहे. इंग्लंडच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट खेळणे कसोट क्रिकेटपेक्षा सोपे आहे. त्यामुळं आमच्यावर दबाव असला तरी, आम्ही चांगली कामगिरी करु शकतो”, असे मत व्यक्त केले.

तसेच कोहलीनं, “हा विश्वचषक खुप तणावपुर्ण आहे. मी 2011, 2015ला विश्वचषक खेळलो आहे, मी कर्णधार म्हणून हा पहिला विश्वचषक असल्यामुळं माझ्यावर थोडं दडपण आहे. यंदाचा प्रत्येक संघ चांगला आहे. अफगाणिस्तानचा संघ घेतला तर तो संघ आधी काय होता आणि आता काय आहे, हे पाहिल्यानंतर आपल्याला विश्वचषका कोणत्या पातळीवर आहे हे आपल्याला कळेल’’, असेही सांगितलं. 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे, परंतु भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत

15 खेळाडूंच्या चमुत सामील केलेल्या खेळाडूंमुळं अनेक वाद झाले. दरम्यान त्यानंतर आयपीएलमुळं अनेक खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले होते. यात केदार जाधवचा समावेश होता. त्यामुळं विश्वचषकाच्या संभाव्य संघात सामिल झालेला केदार जाधव विश्वचषक खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळं संभाव्य संघात बदल अपेक्षित होते, परंतु केदार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची घोषणा निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केली. त्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला किंवा अन्य कुणालाही संधी मिळण्याची शक्यताही विरली आहे.

Loading...

‘कुल्चा’ची जोडी हिटचं

पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या जोडीवर महत्त्वाचं योगदानं दिलं. कोहली म्हणाला की, “ हे दोन्ही फिरकीपटू भारतासाठी महत्त्वाचे आहेत. कुलदीपकरिता आयपीएल चांगलं ठरलं नसलं तरी, तो विश्वचषकात नक्कीच चांगली कामगिरी करेल’’, असे मत व्यक्त केले.

धोनी संघाची मुख्य ताकद

गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा होती. दरम्यान यावर विराट कोहलीनं धोनीची बाजू घेत, धोनी भारतासाठी महत्त्वाचा आहे, असे सांगितले. तर, शास्त्री यांनी, “धोनी संघासाठी खुप महत्त्वाचा आहे. त्याचा अनुभव भारताला विश्वचषकात खुप पुढे घेऊन जाईल. खेळाडू म्हणून तो काय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रन आऊट, स्टम्पिंग यासाठी तर त्याची चपळता आपण पाहिलीच आहे. त्यामुळं धोनीवर खुप मोठी जबाबदारी असणार आहे’’, असे सांगितले.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

वाचा- IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात

वाचा- 106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!

वाचा- सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध


VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...