VIDEO : आता विराट आणि हरमनप्रीत खेळणार एकाच संघात

#ChallengeAccepted या मोहिमे अंतर्गत पुरुष संघ आणि महिला संघ एकत्र खेळताना दिसणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 02:48 PM IST

VIDEO : आता विराट आणि हरमनप्रीत खेळणार एकाच संघात

बंगळुरू, 3 एप्रिल : आपल्याकडे क्रिकेटच्या चाहत्यांची काही कमी नाही. मग तो भारतीय पुरुष संघ असो किंवा महिलांचा. त्यात पुरुष संघाला आणि खेळाडूंना आपल्याकडे जास्त मागणी असली तरी, मागच्या वर्षी झालेल्या विश्वचषकात तुफान कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत पोहचल्या. त्यामुळं मिताली राजसह आता हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामुर्ती स्मृती मंधना यांचे चाहतेही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या इतकेच सगळे खेळाडू एकत्र आले तर. तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना. पण तसंच काहिसं होणार आहे.यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मिताली, हरमनप्रीत आणि वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली एक संदेश देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आगामी काळात महिला व पुरुष एकाच संघातून एकत्र खेळताना दिसतील असे सांगण्यात आले आहे. याबाबत विराट कोहलीनं ,''क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव होत नाही. त्यामुळे सर्वांना समान वागणुक मिळणे आवश्यक आहे’’, असे मत व्यक्त केले. तर, भारताची कर्णधार मिताली राज हिनं,'' गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटमध्ये प्रगती झालेली आहे. पण, मैदानावर, चाहत्यांमध्ये असमानता दिसते. खेळपट्टीचा आकार, मिळणाऱ्या संधी आणि पगार यात महिला क्रिकेटला अजूनही दुय्यम स्थान मिळत आहे. त्यामुळे या मोहीमेला मी पाठींबा देत आहे.''तर, हरमनप्रीतनं, ‘’लोक पुरुष आणि महिला यांच्यात क्रिकेटच्या मैदानातही भेदभाव करतात. पण मला चाहत्यांना सांगायला आवडेल की, 150 किमीच्या वेगानं येणाऱ्या चेंडूला मी कधीच घाबरत नाही, आणि मला मैदान किती मोठं आहे याची काळजी वाटत नाही. माझ्यात आत्मविश्वास आहे, की मी चौकार मारू शकते’’, असा विश्वास व्यक्त केला

या मोहिमेअंतर्गत महिला संघ आणि पुरुष संघ एकत्र येऊन खेळणार आहेत. हे सामने कधी आणि कुठे होणार याबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.


VIDEO: उचलली जीभ : 'या' भाजप नेत्याचा दांडगा उत्साह एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...