मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Virat Kohli: विराट-बाबर आझमचे लहानपणीचे फोटो Viral, फॅन्सनी म्हटलं 'अरे हे तर...'

Virat Kohli: विराट-बाबर आझमचे लहानपणीचे फोटो Viral, फॅन्सनी म्हटलं 'अरे हे तर...'

विराट-बाबर आझम

विराट-बाबर आझम

Virat Kohli: विराट कोहली आणि बाबर आझमचे लहानपणीचे फोटो घेऊन कुणीतरी ते व्हायरल केले आहेत. पण या फोटोतलं साम्य बघून त्यावर कमेंट्स येऊ लागले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 29 सप्टेंबर: भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली सध्याची ही मोठी नावं. मैदानावरच्या कामगिरीच्या बाबतीत या दोघांची तुलना अनेक वेळ केली जाते. पण या दोघांचं मैदानाबाहेरचं ट्यूनिंगही छान आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या अगोदर किंवा सामन्यानंतर अनेक वेळा या दोघांना बोलताना पाहण्यात आलंय. सोशल मीडियातही ही स्टायलिश जोडी एकमेकांना कॉम्प्लिमेंट देताना दिसते. काही दिवसांपूर्वी फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटला सपोर्ट करण्यासाठी बाबर आझमनं केलेल्या ट्विटची चर्चा चांंगलीच रंगली होती. पण आता सोशल मीडियात याच दोघांचा एक फोटो व्हायरल होतोय. आणि त्यावर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.

बाबर-विराटचे लहानपणीचे फोटो व्हायरल

विराट कोहली आणि बाबर आझमचे लहानपणीचे फोटो घेऊन कुणीतरी ते व्हायरल केले आहेत. पण या फोटोतलं साम्य बघून त्यावर कमेंट्स येऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये विराट आणि बाबरनं साधारण एकसारखच शर्ट घातलं आहे. तर दोघांची हेअर स्टाईलही एकसारखीच आहे. त्यामुळे 'अरे हे तर कुंभमेळ्यात वेगळे झालेले भाऊ वाटतात...' अशा प्रकारच्या कमेंट चाहत्यांनी दिल्या आहेत. तर कुणी त्यांना 'करण-अर्जुन म्हटलंय...'

हेही वाचा - Neeraj Chopra: पाहा 'गोल्डन बॉय'चा अनोखा अंदाज... फॅन्ससोबत खेळला गरबा, Video Viral

पुन्हा येणार आमने-सामने

दरम्यान आशिया कपनंतर विराट कोहली आणि बाबर आझम पुन्हा आमने सामने येणार आहेत. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताची सलामी पाकिस्तानशी होणार आहे. हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. आशिया कपमध्ये दोन वेळा भारताचा सामना पाकिस्तानशी झाला होता. त्यात साखळी फेरीत भारतानं तर सुपर 4 फेरीचा मुकाबला पाकिस्ताननं जिंकला होता. त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातली वर्ल्ड कपमधली लढत आणखी रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे.

हेही वाचा - T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का 'आऊट'

सध्या पाकिस्तानी संघ इंग्लंडविरुद्ध 7 सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. तर टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कपआधी शेवटचा सराव सुरु आहे. या सामन्यानंतर दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपसाठी रवाना होतील.

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Pakistan, T20 cricket, T20 world cup 2022, Team india, Virat kohli