अनुष्कासोबत विराटचही करवा चौथचं व्रत, शेअर केला PHOTO

करवा चौथचा फोटो शेअर करताना विराट-अनुष्का यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे विराटनंसुद्धा हे व्रत केल्याचं म्हटलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 08:16 AM IST

अनुष्कासोबत विराटचही करवा चौथचं व्रत, शेअर केला PHOTO

मुंबई, 18 ऑक्टोबर : करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा झाला. सेलिब्रेटी आणि स्टार मंडळी तरी यात मागे कशी राहतील. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत करवा चौथचं व्रत केलं. यावेळचा फोटोही विराटनं शेअर केला आहे.

विराट कोहलीनं फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, जे सोबत व्रत करतात ते सोबत हसतात देखील. यावरून विराटनं देखील करवाचौथचं व्रत केलं असावं असंच वाटतं.

विराटनंतर अनुष्कानेदेखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. अनुष्काने म्हटलं की, माझा आयुष्यभराचा साथी आणि त्यानंतरचासुद्धा, आजच्या माझ्या व्रताचा सोबती. विराट आणि अनुष्का दोघांनीही एकच फोटो शेअर केला आहे.

Loading...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. इटलीमध्ये झालेल्या या लग्नामध्ये मोजकेच पाहुणे आणि मित्र उपस्थित होते. विराट-अनुष्कानं लग्नाबद्दल प्रचंड गुप्तता पाळली होती.

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेसुद्धा पत्नी प्रतिमा सिंहसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याने करवा चौथचा फोटो शेअर करताना म्हटले की, माझी सर्वात आवडती व्यक्ती आणि तुम्हा सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा!

VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...