Elec-widget

अनुष्का शर्मापेक्षा विराटचा अभिनय भारी, VIDEO व्हायरल

अनुष्का शर्मापेक्षा विराटचा अभिनय भारी, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर विराटचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

बंगळुरू, 24 एप्रिल : विराट कोहली आणि त्याची बायको अनुष्का शर्मा यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. दरम्यान अनुष्का बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्री असल्यामुळं ती नेहमीचा आपल्या अभिनयामुळं समाज माध्यमांमध्ये सतत दिसते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराटचं नशीब काही त्याची साथ देत नाही आहे. सलग सात सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर विराटनं संघाकडून विजयाच्या आशा सोडल्या होत्या. मात्र त्यानंतर विराटनं सलग दोन सामने जिंकले. दरम्यान विराटला प्ले ऑफमध्ये आपली जागा करण्यासाठी बंगळुरु संघाला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

दरम्यान सध्या विराट आणि अनुष्का म्हणजेच विरुष्का, बंगळुरूमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. यावेळी ते, हे एक वर्चुअल रिएलिटी शूटिंग गेम खेळत होते. यामध्ये अनुष्का विराटला गोळ्या मारताना दिसते.


त्यानंतर विराट हा गोळ्या लागल्यावर मरणाची अॅक्टींग करताना दिसतो. यावेळी कोहलीने केलेली अॅक्टींग चाहत्यांना चांगलीच आवडलेली दिसत आहे. त्यामुळं विराट आता सिनेमात येतोय की काय अश्या चर्चा रंगु लागल्या आहेत. याआधी विराटचा सरदारी लुक पाहायला मिळाल होता.

Loading...

View this post on Instagram

Sat Shri Akal saarreyaan nu! 🙏🏼

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


या लुकमुळं विराटच्या चर्चा बॉलिवूडपर्यंत रंगल्या होत्या. या फोटोमध्ये विराटनं पंजाबी वेश परिधान केलं आहे.



VIDEO : जेव्हा नरेंद्र मोदी भेटतात पुणेकर रिक्षाचालकाला...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...