मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup नंतर कॅप्टन कोहलीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडूही बदलणार; यांना मिळणार संधी!

T20 World Cup नंतर कॅप्टन कोहलीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडूही बदलणार; यांना मिळणार संधी!

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) टी-20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजदरम्यान टीमच्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, 14 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) टी-20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजदरम्यान टीमच्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपनंतर विराट कोहली (Virat Kohli) टीमची कॅप्टन्सी सोडणार आहे. या सीरिजमध्ये युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. 17, 19 आणि 21 नोव्हेंबरला जयपूर, रांची आणि कोलकात्यामध्ये 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. यानंतर कानपूरमध्ये 25 नोव्हेंबरपासून आणि मुंबईमध्ये 3 डिसेंबरपासून दोन टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत.

कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जून महिन्यात साऊथम्पटनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपासून (WTC Final) बायो-बबलमध्ये आहेत. मागच्या 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांना बायो-बबलमध्ये राहावं लागलं आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे, त्याआधी हे खेळाडू ताजे तवाने व्हावे म्हणून त्यांना आराम दिला जाऊ शकतो, असं बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.

विराट, बुमराह आणि मोहम्मद शमी (Mohamad Shami) यांना आराम दिला जाईल, हे जवळपास निश्चित आहे. एवढच नाही तर रोहित शर्माही भारतात झालेल्या इंग्लंड सीरिजपासून खेळत आहे, त्यामुळे त्यालाही आरामाची गरज असेल, पण विराटने कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहितला आराम मिळणार का नाही? असा प्रश्न आहे. सिनियर खेळाडूंना आराम दिला तर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी हर्षल पटेल, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर यांना खेळवलं जाऊ शकतं.

द्रविड अंतरिम कोच?

टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर रवी शास्त्रीही (Ravi Shastri) टीम इंडियाचे कोच राहणार नाहीत, यानंतर लगेचच न्यूझीलंडविरुद्धची सीरिज सुरू होणार आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती होणं कठीण आहे, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) अंतरिम कोच असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: New zealand, Team india, Virat kohli