टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींची एंट्री

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींची एंट्री

कॅप्टन विराट कोहलीही रवी शास्त्रीसाठी अनुकुल असल्याचं कळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा रवी शास्त्रींवर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जावू शकते.

  • Share this:

27 जून : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आता नवा टिवस्ट आला असून माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एंट्री घेतलीये. कॅप्टन विराट कोहलीही रवी शास्त्रीसाठी अनुकुल असल्याचं कळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा रवी शास्त्रींवर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जावू शकते.

रवी शास्त्री लवकरच प्रशिक्षकपदाचा अर्ज दाखल करणार आहे. प्रशिक्षक म्हणून विराट कोहलीची रवी शास्त्रींना पहिली पसंती आहे. चॅम्पियन्स ट्राॅफीच्या आधी विराटने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रशिक्षकपदासाठी शास्त्रींचं नाव सुचवलं होतं.

तर दुसरीकडे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माजी कॅप्टन वीरेंद्र सेहवाग, सनराइजर्स हैदराबादचे प्रशिक्षक टाॅप मुडी, डोडा गणेश, लालचंद राजपूत आणि रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे. 24 जूनला बीसीसीआयने अर्ज दाखल करण्याची तारिख वाढवून 9 जुलै केली आहे.

जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकांची घोषणा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 07:51 PM IST

ताज्या बातम्या