मोहाली, 04 मार्च: टीम इंडियाची (India vs Sri Lanka test match, Mohali) श्रीलंकेविरुद्ध आजपासून मोहालीत सुरू होणारी टेस्ट मॅच (Test Match) विराट कोहलीसाठी (Virat Kohli) विशेष महत्त्वाची होती. कारण ही मॅच विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वी टेस्ट मॅच (100th Test Match) आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापूर्वी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला टीम इंडियाची कॅप प्रदान केली. या वेळी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) मैदानावर या सोहळ्यासाठी उपस्थित होती. कॅप घेतल्यानंतर कोहलीने प्रशिक्षक आणि सर्व खेळाडूंचे आभार मानले. यानंतर त्याने अनुष्काला मिठी मारली आणि किस केलं.
त्याचा हा व्हिडीओ बीसीसीआय (BCCI)अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीट केला आहे. या व्हिडीओत मैदानावर टेस्ट मॅचमधील टीम इंडियाचे सगळे खेळाडू उपस्थित असून, टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) विराट कोहलीला अत्यंत सन्मानपूर्वक एका पेटीत ठेवलेली कॅप प्रदान करताना दिसत आहेत. यावेळी राहुल द्रविड यांनीही विराटचं कारकीर्दितला हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल कौतुक केलं. त्याच्या खेळाची प्रशंसा केली. यानंतर विराटने सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर त्याने अनुष्काला मिठी मारली आणि किस केलं.
What a moment to commemorate his 100th Test appearance in whites 🙌🏻 Words of appreciation from the Head Coach Rahul Dravid and words of gratitude from @imVkohli👏🏻#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/zfX0ZIirdz
— BCCI (@BCCI) March 4, 2022
बीसीसीआयने ट्वीट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनीही ट्विटरवर कोहलीचं अभिनंदन केलं आहे. सचिन तेंडुलकर, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद कैफ, सुरेश रैना आदी अनेक खेळाडूंनीही कोहलीचं अभिनंदन केलं आहे.
हे वाचा-सौरव गांगुलीनं मोडले BCCI चे नियम, निवड समिती सदस्यांनीच केली पोलखोल
दरम्यान अनेक युजर्स अनुष्काच्या उपस्थितीवरून तिला ट्रोल करत आहेत, तर कोहलीचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून प्रदीर्घ काळ कामगिरी बजावलेल्या विराटने 2011मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 7 डबल सेन्च्युरीज झळकावल्या असून, 27 सेंच्युरीज आणि 28 हाफ सेंच्युरीज केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची रन्सची सरासरी 50 आहे.
हे वाचा-कॅप्टन रोहितनं पहिल्याच मॅचमध्ये केली मोठी चूक, मान खाली घालण्याची आली वेळ
'मी कधीच 100 टेस्ट मॅच खेळण्याचा टप्पा गाठेन असा विचार केला नव्हता. टेस्ट क्रिकेटचं माझ्या आयुष्यात एक वेगळंच स्थान आहे. 100 टेस्ट मॅचेसमध्ये मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे. मी माझ्या फिटनेसबाबतही खूप मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या कोचसाठीही हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. तेही खूप आनंदी आहेत,' अशा भावना विराटने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान या टेस्टमध्ये त्यानं शतक करावं अशी सर्व फॅन्सची इच्छा होती. विराटच्या शतकाकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली. मोहाली टेस्टमध्ये रंगात आलेला विराट 45 रन काढून आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Rahul dravid, Test cricket, Virat anushka, Virat kohali, Virat kohli, Virat kohli and anushka sharma