...तेव्हा अनुष्कासमोर विराटचे डोळे पाणावले

...तेव्हा अनुष्कासमोर विराटचे डोळे पाणावले

त्याने अनुष्कासोबतच्या काही अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला .काही स्पेशल आठवणी शेअर केल्यात.

  • Share this:

12 जून : बॉलिवूडची चुलबुली गर्ल अनुष्का शर्मा आणि क्रिकेटमध्ये विराट खेळी खेळणारा कर्णधार विराट कोहली यांच्या प्रेमाच्या चर्चा आज सगळीकडे सुरू आहेत. मध्ये त्यांच्यात खटके उडाले होते. ब्रेक अप झाल्याच्या चर्चा ही रंगल्या. पण आता 'नो वरिज'. दोघांचं प्रेम खुलतंय. प्रेम बहरतंय. दोघं अनेक चित्रपटांच्या  प्रीमियरला जोड्याने  जातात.

विराटला नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुष्काबद्दल विचारलं असता त्याचा  चेहरा खुलला. गालावरचं हसू तो लपवू शकत नव्हता. त्याने अनुष्कासोबतच्या काही अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला.  विराट म्हणतो," कसोटीचं कर्णाधारपद सोपवण्यात आलं तो क्षण आयुष्यातला महत्त्वपूर्ण होता. त्यावेळी मी मोहालीमध्ये होतो. तेव्हा ही बातमी मला फोनवर देण्यात आली. त्यावेळी अनुष्का माझ्यासोबत होती. तिला याबद्दल मी सांगितलं. तेव्हा माझ्यासमोर माझी क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात आणि आजचा दिवस डोळ्यासमोर उभा ठाकला. क्रिकेट अकादमीसाठी खेळण्यापासून ते टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदापर्यंत पोहचणार याचा मी कधीच विचार केला नव्हता. त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, हा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि हे दिवस मी अनुष्कासोबत शेअऱ करू शकलो. हे दिवस कायम आठवणीत राहणारे आहे."

चला तर ऐकू या विराट काय म्हणतोय ते -

(सौ.-यु ट्युब)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 06:31 PM IST

ताज्या बातम्या