नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या सेलेब्रिटी कपलने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (Virushka blessed with baby girl) Good News दिली आहे. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे.
भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतला महत्त्वाचा सामना ड्रॉ झाला, त्याच वेळी भारतीय कप्तानाच्या घरी मुलीने जन्म घेतला. सोमवारी दुपारीच अनुष्काने मुलीला जन्म दिला. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचं विराटने कळवलं आहे. "आम्हाला जाहीर करण्यात प्रचंड आनंद होतो आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आमच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. पण या क्षणी आमचं खासगीपण जपण्याच्या अधिकाराचा आपण सगळे मान राखाल", अशा शब्दांत विराट कोहलीने Instagram पोस्टमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
देशातली सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी
विराट कोहली, अनुष्का शर्मा भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारं जोडपं आहे. लवकरच आई वडील होणार हे या दोघांनी जाहीर केलं, तेव्हापासून या दोघांच्या होणाऱ्या बाळाची चर्चा होती. विरुष्काने हे जाहीर केलं तेव्हा खरं तक देशात Coronavirus आणि लॉकडाऊनची भीती होती. तरीही सोशल मीडियावर सर्वांत ट्रेंड होणारा विषय हाच होता.
अनुष्का शर्माने गरोदरपणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नुकतंच अनुष्का शर्माने एका मॅगझिनसाठी फोटोशूटही केलं आहे. त्याचे फोटो अजूनही चर्चेचा विषय ठरलेले आहेत. या फोटोंमध्ये ती आपले बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसली. त्यावरून तिचं कौतुक झालं आणि टीकाही झाली.
पण या सेलेब्रिटी कपलच्या मागे असलेली चाहत्यांची फौज पाहता आता आम्हाला आमचे खासगी क्षण जगू द्या, असं आवाहन विराटने या गोड बातमीबरोबर केलेलं दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat kohali, Virat kohli and anushka sharma