कोहलीने तोडला सचिनचा रेकॉर्ड

कोहलीने तोडला सचिनचा रेकॉर्ड

लक्ष्याचा पाठलाग करत कोहलीने 102 मॅचेसमध्ये 18 शतकं ठोकली आहेत तर सचिनने 232 मॅचेसमध्ये 17 शतकं लक्ष्याचा पाठलाग करत ठोकली होती.

  • Share this:

08जुलै : वेस्टइंडीजमध्ये कोहली फक्त मालिका जिंकला नाही तर त्यासोबतच त्यानं एक नवा रेकॉर्डही बनवलाय. हा रेकॉर्ड आहे वनडेमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत केलेल्या सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड. हा रेकॉर्ड आतापर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

लक्ष्याचा पाठलाग करत कोहलीने 102 मॅचेसमध्ये 18 शतकं ठोकली आहेत तर सचिनने 232 मॅचेसमध्ये 17 शतकं लक्ष्याचा पाठलाग करत ठोकली होती. विराटनं हे रेकॉर्ड फारच कमी काळात बनवलंय. तसंच आतापर्यंत विराटने वनडेमध्ये 28 शतकं ठोकली आहेत. वनडेमध्ये तिसरा सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज आता विराट ठरलाय. सर्वाधिक 49 शतकं ही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत तर त्यानंतर 30 शतकं ही रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहेत.लवकरच पॉन्टिंगला मागे टाकत विराट अजून दुसऱ्या नंबरवर येईल अशी अपेक्षा आहे.

याशिवाय वेस्ट इंडीजविरूद्ध त्यांच्याच भूमीवर जाऊन 2 शतकं ठोकणाराही पहिला भारतीय कर्णधार ठरलाय. आतापर्यंत कोहलीने वेस्ट इंडिजविरूद्ध 4 शतकं ठोकली आहेत.

First published: July 8, 2017, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading