विराट कोहली ठरला सगळ्यात वेगवान 9000 धावा करणारा फलंदाज

विराट कोहली ठरला सगळ्यात वेगवान 9000 धावा करणारा फलंदाज

याआधी सर्वात जलद 9 हजार धावांचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. डिव्हिलियर्सने वर्षाच्या सुरुवातीलाच हा विक्रम आपल्या नावावर केला होता

  • Share this:

कानपूर, 29 ऑक्टोबर: आज कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड दरम्यान या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक रेकोर्डची नोंद केली आहे.

जलदगतीने पूर्ण केले 9000 धावा

विराट एकदिवसीय सामन्यातला एक प्रभावी कर्णधार आहे. आजच्या सामन्यात विराटने जेव्हा 83 धावा केल्या आणि आणखी एक विक्रम आपल्या नावावर करून घेतला. कारण त्याच्या 83व्या धावेसकट त्याच्या वनडेतल्या 9000 धावा पूर्ण झाल्या. 9 हजार धावांचा आकडा पार करणारा विराट सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे.

कानपूर एकदिवसीय सामन्याआधी, विराटने 201 एकदिवसीय सामन्यांमध्ये 193 डावांमध्ये 8917 धावा केल्या होत्या.

 डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला

याआधी सर्वात जलद 9 हजार धावांचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. डिव्हिलियर्सने वर्षाच्या सुरुवातीलाच हा विक्रम आपल्या नावावर केला होता. डिव्हिलियर्सने 214 सामन्यांत 205 डावांमध्ये या विक्रम नोंदवला होता. पण विराट पठ्ठ्याने मात्र फक्त 202 सामन्यांमधेच हा नवीन विक्रम बनवला आहे.

विराटला 'हाही' विक्रम मोडायचाय !

एक कर्णधार म्हणून सलग सात मालिका जिंकण्याचा विक्रम विराटने करावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. जर भारताने कानपूरचा एकदिवसीय सामना जिंकला तर हा विक्रम विराटच्या नावावर केला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 08:45 PM IST

ताज्या बातम्या