विराट कोहलीनं सोडलं मौन

विराट कोहलीनं सोडलं मौन

ड्रेसिंग रुममध्ये झालेली चर्चा मी कधीही बाहेर सांगणार नाही असं वक्तव्य विराट कोहलीने शुक्रवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी केलंय

  • Share this:

23 जून : कोहली-कुंबळे वादावर पहिल्यांदाच कोहलीनं आपले मौन सोडलंय. ड्रेसिंग रुममध्ये झालेली चर्चा मी कधीही बाहेर सांगणार नाही असं वक्तव्य विराट कोहलीने  शुक्रवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी केलंय.कुंबळेसोबतच्या कोहलीच्या संबंधांबाबत बोलताना त्याने हे वक्तव्य केलंय.

दोनच दिवसांपूर्वी कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कुंबळेच्या राजीनाम्याचा आपण आदर करतो असं कोहलीच म्हणणं आहे. 'अनिल भाईंनी निश्चित स्वरुपात आपले विचार व्यक्त केले आहेत आणि त्यांनी पदावरून हटण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो', असंही कोहली पुढे म्हणाला. ही घटना स्पर्धेनंतर घडलेली आहे याकडंही कोहलीनं लक्ष वेधलंय.

 

First published: June 23, 2017, 12:50 PM IST

ताज्या बातम्या