फलंदाजाला बाद करण्यासाठी खेळाडू त्याच्या मागे धावले, पाहा viral video

फलंदाजाला बाद करण्यासाठी खेळाडू चक्क त्याच्या मागे लागले.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 09:33 PM IST

फलंदाजाला बाद करण्यासाठी खेळाडू त्याच्या मागे धावले, पाहा viral video

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू काय करतील याचा नेम नाही अशी एक घटना घडली आहे. साधारपणे फलंदाजाला बाद करण्यासाठी उत्तम गोलंदाजी, क्षेत्ररक्षण केले जाते किंवा विकेटकिपर चपळता दाखवून फलंदाजाला बाद करतो. पण एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी खेळाडू चक्क त्याच्या मागे लागले आहेत असे तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

सध्या न्यूझीलंड आणि श्रीलंका (Sri Lanka Vs New Zealand) यांच्यात कसोटी सामना (SL Vs NZ Galle Test) सुरू आहे. या सामन्यात एक अजब प्रकार घडला. क्रिकेटच्या मैदानावर कदाचित असा प्रकार कधीच घडला नसेल. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचा फलंदाज ट्रेंट बोल्ट एक चेंडू स्वीप करताना तो बॅटला लागून हेल्मेटमध्ये गेला. चेंडू बोल्टच्या हेल्मेटमध्ये गेल्याचे कळाल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू त्याच्या मागे धावत गेले. बोल्ड देखील त्यांच्यापासून दूर पळू लागला आणि चेंडू हेल्मेटमधून काढण्याचा प्रयत्न करु लागला. पण त्याला तो चेंडू काही केल्या बाहेर काढता येईना. बोल्टच्या या सर्व प्रकारावर लंकेच्या खेळाडूंना हसू आवरता आले नाही. अखेर त्यांनीच हेल्मेटमधून चेंडू काढला आणि मैदानात एकच हस्य पिकले.

न्यूझीलंडच्या डावात 82 व्या षटकात लंकेचा फिरकीपटू लसिथ एमबुलदेनियाने जेव्हा बोल्टला चेंडू टाकला तेव्हा तो हेल्मेटच्या आत गेला. अर्थात त्यानंतर बोल्ट 18 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 249 धावा केल्या. बदल्यात लंकेने 267 धावा केल्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 285 धावा केल्या. लंकेने दुसऱ्या डावात आतापर्यंत शून्यबाद 133 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजून 135 धावा हव्या आहेत.

Loading...

SPECIAL REPORT : पंकजा मुंडेंनी सुचवली योजना, मराठवाड्याचं बदलेलं भाग्य?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...