श्रीलंकेतील बॉम्बस्फोटामुळे धक्का, विराटची ट्विटरवरून शोकसंवेदना

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटामुळे धक्का, विराटची ट्विटरवरून शोकसंवेदना

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

दिल्ली, 21 एप्रिल : श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 450 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने बॉम्बस्फोटाच्या घटनेने मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. आम्ही या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांच्या दु:खात सहभागी असून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थनाही त्याने केली आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा केला जात असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. आतापर्यंत 8 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 99 जणांचा मृत्यू तर 450 हून अधिक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे ISIचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ईस्टर संडेच्या पवित्र दिनीच चर्चवर हल्ला करण्यात आला. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते.कोलंबोतील शांगरीला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. बॉम्बस्फोटानंतर लोकांनी ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सेंट अँथनी चर्चमध्ये स्फोटानंतरची दृश्ये मन विचलित करणारी आहेत. यात जमिनीवर ढिगारा पडला असून त्याखाली लोक सापडले आहेत.

दरम्यान, यात भारतीय नागरिक आहेत का? याची माहिती घेतली जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. कोलंबोतील उच्चायुक्तालयाशीसुद्धा भारत संपर्कात आहे.

कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट; स्फोटाचा भीषणता सांगणार VIDEO समोर

First published: April 21, 2019, 12:18 PM IST

ताज्या बातम्या