मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंडोनेशिया हादरलं, फुटबॉल मॅचमध्ये पराभवानंतर हिंसाचार आणि चेंगराचेंगरी, 127 जणांचा मृत्यू, VIDEO

इंडोनेशिया हादरलं, फुटबॉल मॅचमध्ये पराभवानंतर हिंसाचार आणि चेंगराचेंगरी, 127 जणांचा मृत्यू, VIDEO

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया या दोन टीममध्ये हा सामना रंगला होता. पण या सामन्यात अरेमा टीमचा पराभव झाला.

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया या दोन टीममध्ये हा सामना रंगला होता. पण या सामन्यात अरेमा टीमचा पराभव झाला.

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया या दोन टीममध्ये हा सामना रंगला होता. पण या सामन्यात अरेमा टीमचा पराभव झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

बाली, 02 ऑक्टोबर : इंडोनेशियामध्ये फुटबॉल मॅच सुरू असताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूर्व जावा मलंग रिजेंसी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये इंडोनेशियाई बीआरआई लीगा-1 च्या फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता.

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया या दोन टीममध्ये हा सामना रंगला होता. पण या सामन्यात अरेमा टीमचा पराभव झाला. टीमचा पराभव झाल्यामुळे अरेमा टीमच्या चाहत्यांनी एकच गोंधळ घातला. मैदानावर तोडफोड सुरू केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराचे नळकांडे फोडले. या गोंधळात चेंगराचेंगरी झाली. अनेकांचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. स्टेडियमच्या आतमध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला. तर इतरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. स्टेडियमवर मृतदेहांचा खच पडला होता. प्लास्टिकच्या बॅगेतून मृतदेह नेले जात होते.

इंडोनेशिया के फुटबॉल संघ (PSSI) या घटनेबद्दल पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 'अरेमा टीमच्या समर्थक चाहत्याच्या कृत्यामुळे आम्ही खेद व्यक्त करतो. या दुर्घटनेमध्ये ज्या निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांनी आम्ही माफी मागतो. या घटनेबद्दल एक चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे.'

बीआरआई लीगा-1 ने या घटनेनंतर सर्व सामने एका आठवड्यासाठी रद्द केले आहे. अरेमा एफसी टीमला या सीझनसाठी मनाई करण्यात आली आहे.

First published:

Tags: Marathi news